दारू पिण्यास पैसे न दिल्याने हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:33 AM2020-12-04T04:33:08+5:302020-12-04T04:33:08+5:30
शिरजगाव कसबा : दारू पिण्याकरिता पैसे न दिल्याने गावातीलच युवकांनी एका इसमाला चाकूचे वार करून संपविले. १ डिसेंबरच्या रात्री ...
शिरजगाव कसबा : दारू पिण्याकरिता पैसे न दिल्याने गावातीलच युवकांनी एका इसमाला चाकूचे वार करून संपविले. १ डिसेंबरच्या रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी आरोपींनी शिरजगाव कसबा पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.
पोलीस सूत्रांनुसार, सुधाकर भीमराव भुरमुदे (४३) असे मृताचे नाव आहे. शिरजगावातील अमित जयस्वाल यांच्या दारूभट्टीसमाेरून ते गुजरी बाजारात भाजीपाला आणण्यासाठी निघाले होते. यावेळी गावातीलच सदानंद धाकडे व विजय मंडलिक तसेच आकाश धाकडे यांनी दारू पिण्याकरिता त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याच्या रागातून आकाश धाकडे याने चाकूने सुधाकर भुरमुदे यांचे शरीरावर सपासप वार केले. यानंतर सर्व जण पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरानी मृत घोषित केले.
दरम्यान, ठाणेदार सचिन परदेशी यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरोपींना पकडण्याकरिता पथक तयार केले. या पथकाने बुधवारी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनाेज सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.