घरगुती वादातून जन्मदात्रीची हत्या, रिकामटेकड्या पोटच्या गोळ्याकडून तीक्ष्ण शस्त्राने वार : सावंगा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 04:24 PM2023-07-02T16:24:40+5:302023-07-02T16:25:12+5:30

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी जन्मदात्री आईवर तीक्ष्ण शस्त्राने वार करीत पोटच्या गोळ्याने हत्या केली.

Murder of mother due to domestic dispute, stabbing with sharp weapon from empty stomach bullet: incident in Savanga | घरगुती वादातून जन्मदात्रीची हत्या, रिकामटेकड्या पोटच्या गोळ्याकडून तीक्ष्ण शस्त्राने वार : सावंगा येथील घटना

घरगुती वादातून जन्मदात्रीची हत्या, रिकामटेकड्या पोटच्या गोळ्याकडून तीक्ष्ण शस्त्राने वार : सावंगा येथील घटना

googlenewsNext

अमरावती: वरूड तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंगा (लोणी) येथे घरगुती कारणातून पोटच्या मुलाने जन्मदात्रीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करीत तिची हत्या केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

रजियाबी मस्तान शाह (७०) असे मृत महिलेचे, तर मंजूर शाह मस्तान शाह (३९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंजूर शाह याला पत्नी, १५ वर्षीय मुलगी व १२ वर्षीय मुलगा आहे. परंतु, तो काहीही कामधंदा करीत नसल्याने पत्नी मुलांना घेऊन माहेरी निघून गेली आहे. यानंतर घरात राहिलेल्या आईशी वाद घालून शिवीगाळ करत मंजूर शाह तिला मारहाण करीत होता.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी जन्मदात्री आईवर तीक्ष्ण शस्त्राने वार करीत पोटच्या गोळ्याने हत्या केली. या घटनेची तक्रार पोलिस पाटील शिल्पा आंडे यांनी बेनोडा पोलिस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसेच मुलगा मंजूर शाह याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार स्वप्निल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात अतुल मस्के, विवेक घोरमाडे, चंद्रशेखर वानखेडे, ललित तायडे, संदीप लेकुरवाळे करत आहेत.

 

Web Title: Murder of mother due to domestic dispute, stabbing with sharp weapon from empty stomach bullet: incident in Savanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.