दोन अल्पवयीन मुलांनी केली युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:11 AM2020-12-26T04:11:54+5:302020-12-26T04:11:54+5:30

बहिणीची छेड काढल्याने राग अनावर, लुंबिनीनगरातील घटना अमरावती : बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन विधी संघर्ष बालकांनी एका युवकाची ...

Murder of a teenager by two minors | दोन अल्पवयीन मुलांनी केली युवकाची हत्या

दोन अल्पवयीन मुलांनी केली युवकाची हत्या

Next

बहिणीची छेड काढल्याने राग अनावर, लुंबिनीनगरातील घटना

अमरावती : बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन विधी संघर्ष बालकांनी एका युवकाची चाकूने सपासप वार करून हत्या केली. ही घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील कुंभारवाडा स्थित लुंबिनीनगरात शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. काही वेळातच पोलिसांनी दोन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले.

पोलीससूत्रानुसार, रितेश ऊर्फ बंटी संतोष बारसे (२१, रा. पंचशीलनगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे. मृत पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर चोरी, लुटमारीचे गुन्हे फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी १६ व १७ वर्षीय विधी संघर्ष बालकावर भादंविचे कलम ३०२, ३४, सहकलम ४,२५ आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. रितेश हा मोलमजुरीचे काम करीत होता. त्याने यातील एका आरोपीच्या बहिणीची छेड काढली होतीे. त्यामुळे मित्राच्या सहकार्याने त्यांनी रितेशचा काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी रितेश लुंबिनीनगरात एकटा उभा असताना दोन्ही आरोपीने त्याच्यावर चाकूहल्ला चढविला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर अवस्थेत पडलेल्या रितेशला पोलीस व नागरिकांनी इर्विन रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

बॉक्स:

पोहरा मार्गावरून घेतले ताब्यात

युवकाचा खून झाल्याची घटना वाॅकीटॉकीवरून पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांना मिळाली. तेव्हा ते गस्तीवर होते. चांदूररेल्वे, पोहरा मार्गावरील हिलस्टॉप हॉटेलजवळून ते येत असताना एका दुचाकीवरून आरोपी जाताना त्यांच्या दृष्टीस पडले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी वाहन परतून त्यांचा पाठलाग करून वैष्णवी देवीच्या मंदिराजवळून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता युवकाची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन चाकू पोलिसांनी जप्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, एपीआय बिपीन इंगळे, डीबी स्कॉडचे एएसआय प्रकाश राठोड, सागर, भजगवरे, अनूप झगडे, दीपक सुंदरकर, सागर पंडित उपस्थित होते.

Web Title: Murder of a teenager by two minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.