प्रक्येक आजार, रोग बरा करण्याची ताकद संगीतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:29+5:302021-06-22T04:10:29+5:30
अमरावती : प्रत्येक आजार तथा रोग बरा करण्याची शक्ती संगीतात आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी एका ...
अमरावती : प्रत्येक आजार तथा रोग बरा करण्याची शक्ती संगीतात आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त शशिकांत
सातव यांनी एका कार्यक्रमात केले. ते संगीत साधना म्यूजिकल ग्रुपच्या रंगारंग प्रस्तुती कार्यक्रमात बोलत होते.
येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सोमवारी निवडक कलाकारांच्या उपस्थितीत संगीत दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, महापालिके सहआयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. त्यानंतर एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण झाले. गीत, गजलांनी उपस्थितांना मंत्रमूग्ध केले. भाऊराव चव्हाण, अनंत पाटणे, दर्शन खंडेलवाल, मनोज अग्रवाल, अभिलाषा विश्वकर्मा, अजय विंचूरकर, अरविंद मोकादम, गिरीश गगलानी, अनिल पडोले, संगीता ठाकरे, शशिकांत सातव, नरेंद्र वानखडे, डाॅ. गुणवंत डहाने, चंद्रकांत पोपट, राजेश हरकुट, अनिल मुणोत, नैना दापुरकर, दिलीप बागडे यांनी गायनात सहभाग नोंदविला. यावेळी मोनिका उमक, नीता गिरी, रितेश शर्मा, स्वाती अदगुलवार, जय बगड उपस्थित होते.