मुस्लिम समाजाला हवे दहा टक्के आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:34+5:302021-06-27T04:09:34+5:30

वनोजा बाग : मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयासमोर मोईन मोहम्मद यांच्या ...

The Muslim community wants ten percent reservation | मुस्लिम समाजाला हवे दहा टक्के आरक्षण

मुस्लिम समाजाला हवे दहा टक्के आरक्षण

Next

वनोजा बाग : मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयासमोर मोईन मोहम्मद यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे वचन दिले होते, ते पूर्ण करून मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण लागू करावे. त्यामुळे समाजातील बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी शुक्रवारी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनप्रमुख मोईन मोहम्मद यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी १४ डिसेंबर २०२० ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री नबाब मलिक यांना निवेदन दिले होते. त्यानंतर २१ जून २०२१ ला तहसीलदारांमार्फत लेखी निवेदन पाठवले होते. परंतु, शासनाने कुठलीही पावले उचलली नाहीत.

डॉ. अब्दुल राजिक, मास्टर नाझिम, अर्शद खान, तवाफ, राजू कुरेशी, कलीम, इरफान शाह, विनीत डोंगरदिवे, शेख रहीम, जावेद खान, शफी नियाजी, आमीन, सलीम, हरून मेंबर, शंकर मालठाने आणि मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Web Title: The Muslim community wants ten percent reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.