मुस्लीम महिलेने आॅटो चालवून रोजगाराचा घेतला निर्धार

By admin | Published: January 4, 2016 12:03 AM2016-01-04T00:03:56+5:302016-01-04T00:03:56+5:30

घरची परिस्थिती बेताचीच. मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे, हे फार पूर्वीपासून स्वप्न उराशी बाळगून होते.

A Muslim woman decided to take up employment with the auto | मुस्लीम महिलेने आॅटो चालवून रोजगाराचा घेतला निर्धार

मुस्लीम महिलेने आॅटो चालवून रोजगाराचा घेतला निर्धार

Next

जिल्ह्यात पहिला उपक्रम : सावित्रीच्या लेकीने पुरुषाची मक्तेदारी मोडली
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
घरची परिस्थिती बेताचीच. मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे, हे फार पूर्वीपासून स्वप्न उराशी बाळगून होते. मात्र महिलांना धुणी-भांडी करूनच रोजगार मिळविण्याचा शिरस्ता. वेगळे काही करण्याची मनाशी जिद्द होतीच. सावित्रीबाई फुलेंनी महिलांना जो सन्मान दिला तो कायम ठेवत त्यांच्या जयंतीदिनी एका मुस्लीम महिलेने रोजगारासाठी चक्क आॅटो चालविण्याचा निर्धार घेतला. शबाना परवीन अब्दुल जलील, असे या महिलेचे नाव आहे.
शबाना परवीन या बडनेरा येथील नवीवस्तीच्या मिलचाळ परिसरातील झोपडपट्टीत राहतात. पती अब्दुल जलील हे मोलमजुरीचे काम करतात. रात्रीला सिक्युरिटीचेसुद्धा काम करून ते संसाराचा गाडा हाकतात. मात्र दोन मुले, एक मुलगी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या पतीच्या कमाईतून ते शक्य होत नव्हते. म्हणून यांनी हे धाडस केले.
मुमताज नावाची मुलगी ही बी.ए. च्या प्रथम वर्षाला शिकत आहे. तर इयत्ता दहावी व सातवीत मुले शिक्षण घेत आहेत. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण झाले असताना मुला- बाळांना चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे बरे मिळेल, या विवंचनेत शबाना परवीन सतत असायच्या. परिणामी पतीला काहीतरी हातभार लावता यावा, यासाठी अंगी वाहन चालविण्याचा असलेला गुण सार्थकी लावण्याचे ठरविले. पतीच्या होकारानंतर आॅटो चालवून रोजगार मिळविण्याचा मानस धरला. आॅटो चालविण्याचा परवाना, बॅच, बिल्ला काढण्यासाठी आधारवड फाऊंडेशनची भरीव मदत मिळाली.

आधारवडचा मिळाला आधार
बडनेरा : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात येणाऱ्या अडचणी आधारवड फाऊंडेशनचे विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड यांनी सोडविल्या. रविवारी बडनेरा पोलीस ठाण्यात सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शबाना परवीन यांच्या आॅटोरिक्षा चालविण्याला सहायक पोलीस निरीक्षक मेहत्रे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. एका मुस्लिम महिलेने रोजगासाठी आॅटोरिक्षा हाती घेतल्याची पहिली घटना म्हणून जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे.
यावेळी विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बडनेरा- अमरावती मार्गावर आॅटोरिक्षा चालवून त्यांनी ‘ट्रॉयल’ घेतलीे. आॅटोरिक्षा हा भाड्याने घेऊन चालविणार असल्याचे शबाना परवीन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लहानशा भांडवलातून रोजगार मिळविण्यासाठी आॅटोरिक्षा चालविणे हे सोयीचे आहे. सन्मानाने जगण्याची जिद्द असल्यामुळे पुरुषांची मक्तेदारी असलेला आॅटो रिक्षा व्यवसाय सुरु केला. तेही सावित्रीबार्इंच्या जन्मदिनापासून प्रारंभ करण्याचा वेगळा आनंद मिळाला.
- शबाना परवीन अब्दुल जलील, महिला आॅटो चालक, बडनेरा

Web Title: A Muslim woman decided to take up employment with the auto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.