मुशिर हत्याकांड सीसीटीव्हीत कैद

By admin | Published: November 5, 2015 12:30 AM2015-11-05T00:30:38+5:302015-11-05T00:30:38+5:30

गांधी चौक मार्गावरील विलास सावजी यांच्या हॉटेलमधील सीसीटीव्हीत मुशिरसह चार जणांवर झालेला प्राणघातक हल्ला कैद झाला आहे.

Musser massacre CCTV footage | मुशिर हत्याकांड सीसीटीव्हीत कैद

मुशिर हत्याकांड सीसीटीव्हीत कैद

Next

सहावा आरोपींना अटक : तलवार, दोन चाकू , तीन दुचाकी जप्त
अमरावती : गांधी चौक मार्गावरील विलास सावजी यांच्या हॉटेलमधील सीसीटीव्हीत मुशिरसह चार जणांवर झालेला प्राणघातक हल्ला कैद झाला आहे. याप्रकरणातील सहावा आरोपी दिनेश आठवले याला बुधवारी शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली असून हल्ल्यात वापरण्यात आलेली तलवार, चाकू आणि तीन दुचाकी पोलिसांनी वलगाववरून जप्त केली आहे.
गांधी चौक मार्गावरील विलास सावजी यांच्या हॉटेलमध्ये आरोपी उमेश आठवलेसह पाच जणांनी जेवणासाठी वाद केला. हॉटेलमधील गोंधळ पाहून शेजारील प्रतिष्ठानाचे संचालक तनवीर आलमसह मुशिर आलम, जीया अहमद व बाबा ऊर्फ मकसूद आलम सावजीच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांनी माणुसकी दाखवूून हॉटेल मालक सावजी व उमेश आठवलेचे भांडण सोडविण्यासाठी गेले. मात्र, उमेश आठवलेसह अंकुश सुभाष जिरापूरे(२६), निलेश अशोक आठवले(२७) व शुभम तात्यासाहेब जवजांळ(३१) व राजु माडवे (२५,रा. सर्व राहणार माताखिडकी, महाजनपुरा) यांनी तनवीर आलमसह चारही जणांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुशिर आलम व जिया अहमद गंभीर जखमी झाले. सावजी यांच्या हॉटेलमधील सिसीटीव्हीत हा सर्व गोंधळ व उमेश आठवलेने केलेला प्राणघातक हल्ल्याचे चित्रीकरण झाले आहे. या हल्ल्यात गंभीर झालेल्या मुशिर आलमचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी तणावग्रस्त स्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने तत्काळ आरोपींचा शोध घेऊन पाच आरोपींना अटक केली. पाचही आरोपींना पोलिसांच्या कडकोड बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ७ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची कसुन चौकशी सुरु आहे. बुधवारी सहाव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर आरोपी उमेश आठवलेसह पाच जण वलगाव येथे राहणाऱ्या सासूकडे गेले.
तसेच त्याच्या घरामागील सर्व्हीस लाईनमध्ये तलवार व चाकू लपून ठेवल्याची कबुली आरोंपींनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी वलगाव जावून एक तलवार, दोन चाकू, तीन विना क्रमांकाच्या दुचाकी व रक्तांने माखलेले आरोपींचे कपडे जप्त केले.

Web Title: Musser massacre CCTV footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.