माझे कर्ज माफ झालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:22 AM2017-07-21T00:22:35+5:302017-07-21T00:22:35+5:30

शेतकऱ्यांना अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटानेदेखील हैराण केले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

My debt was not forgiven | माझे कर्ज माफ झालेच नाही

माझे कर्ज माफ झालेच नाही

Next

धामणगावात काँग्रेसचे आंदोलन : दीड हजार शेतकऱ्यांनी भरले फॉर्म
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटानेदेखील हैराण केले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य शासनाच्या फसव्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ स्थानिक तहसील कार्यालयासमोर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आ.वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. यावेळी तब्बल दीड हजार शेतकऱ्यांनी ‘माझे कर्ज माफ झाले नाही’ असे फॉर्म स्वहस्ताक्षरात भरून दिले.
राज्य शासनाने घोषित केलेले तातडीचे १० हजार रूपयांचे कर्ज अद्याप कोणत्याही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. यातील जाचक अटींमुळे शेतकरी पुरते धास्तावले आहेत. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केलीत.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन सिंघवी, बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत गावंडे, जि.प.सदस्य वैशाली बोरकर, अनिता मेश्राम, सुरेश निमकर, प्रियंका दगडकर, पं.स.सदस्य सविता इंगळे, संगीता निमकर, प्रिती ढोबळे, युकाँचे विधानसभाध्यक्ष पंकज वानखडे, सच्चिदानंद काळे, नितीन कनोजिया, रमेश राठी, ऋषी जगताप, सलील काळे, प्रशांत सबाने, जि.प.चे माजी अध्यक्ष सतीश उईके, मोहन घुसळीकर, रंजना उईके आदी उपस्थित होते.

Web Title: My debt was not forgiven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.