नायब तहसीलदारांची कानउघडणी

By admin | Published: March 19, 2017 12:09 AM2017-03-19T00:09:36+5:302017-03-19T00:09:36+5:30

तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत.

Nab Tahsildar's objection | नायब तहसीलदारांची कानउघडणी

नायब तहसीलदारांची कानउघडणी

Next

तहसीलदारांशी उद्धटपणाची वागणूक : निराधार लाभार्थ्यांचे प्रकरण
दर्यापूर : तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत. यासंदर्भाची कैफियत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदांकडे केली. त्यांनी तातडीने दखल घेऊन नायब तहसीलदार एम.डी.चव्हाण यांना शनिवारी दुपारी कक्षात बोलावून विचारणा केली. पण त्यांनी तहसीलदारांना असमाधनकारक उत्तरे दिल्यामुळे तहसीलदार राहुल तायडे यांनी त्यांची कानउघडणी केली.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यांना न्याय मिळण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडे गेले. त्यामुळे तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना बोलावून विचारणा केली. पण नायब तहसीलदारांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच त्यांनी थेट तहसीलदारांशीच बाचाबाची केली. त्यामुळे तहसीलदारांचा पारा चढला. त्यांनी यासंदर्भात नायब तहसीलदारंच्या विरोधात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे अहवाल पाठविणार असल्याची माहिती आहे. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे, मंतु पटेल, प्रफुल्ल वाकोेडे, रणजित धर्माळे, अमोल चांदूरकर, उमेश अंबुलकर, माधव बडे, पवन पाचपौर, अनिल राऊत, योगेश भांडे, करीम पहेलवान, आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांकडे तक्रारही देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तीन माहिन्यांपासून पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, माझ्यासमोर तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना जाब विचारला आहे. त्यामुळे त्यांची बोलती बंद झाली.
- जयंत वाकोडे, मनसे तालुका प्रमुख दर्यापूर

कामात कसूर केल्याप्रकरणी नायब तहसीलदारांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. लवकरच लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
- राहुल तायडे, तहसीलदार

Web Title: Nab Tahsildar's objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.