नाफेडने दिला तूर वाळविण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:06 PM2019-03-05T22:06:39+5:302019-03-05T22:07:22+5:30

नाफेडच्या एका ग्रेडरने तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यास ती उन्हात वाळवून पुन्हा आणण्याचा सल्ला दिला. पुढल्या खेपेला दाणा बारीक असल्याचे सांगत ती नाकारली गेली. नाफेडच्या अशा मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्याने खरेदी-विक्री संघाकडे तक्रार दाखल केली आहे.

Nafed has given advice on how to dry the tur | नाफेडने दिला तूर वाळविण्याचा सल्ला

नाफेडने दिला तूर वाळविण्याचा सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देतुघलकी कारभार खरेदी विक्री संघाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : नाफेडच्या एका ग्रेडरने तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यास ती उन्हात वाळवून पुन्हा आणण्याचा सल्ला दिला. पुढल्या खेपेला दाणा बारीक असल्याचे सांगत ती नाकारली गेली. नाफेडच्या अशा मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्याने खरेदी-विक्री संघाकडे तक्रार दाखल केली आहे.
सामदा येथील शेतकरी महिला कमला बन्सी तराळ व बन्सी नारायण तराळ यांनी त्यांच्या शेतातील १६ क्विंटल तूर २६ फेब्रुवारी रोजी नाफेडमध्ये आणली होती. तुरीमध्ये ओलावा असल्याचे सांगत नाफेडच्या ग्रेडरने ती तूर नाकारली तसेच उन्हात वाळविण्याचा सल्ला दिला. ग्रेडरने सांगितल्यामुळे दोन दिवस तूर उन्हात वाळू घातली व नंतर १ मार्च रोजी परत विक्रीसाठी काट्यावर आणली. यावेळी दाणा बारीक असल्याची बतावणी करून संबंधित ग्रेडरने ती तूर पुन्हा नाकारली. नाफेडमधील या गोंधळाचा फटका तराळ यांना बसला. त्यांना त्यांची तूर परत न्यावी लागली.

शेतकºयाच्या तक्रारीवरून आम्ही त्यांच्या मालाची पाहणी केली. त्यातील तुरीचा नमुना वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. या विषयात संबंधित ग्रेडरकडून लेखी बयान घेण्यात आले आहे.
- राजू गावंडे
व्यवस्थापक, खविसं, दर्यापूर

आठ दिवसांपासून तूर विक्रीसाठी नाफेडमध्ये नेत आहे. ग्रेडरने ती तूर दर्जाहीन असल्याचे सांगत खरेदी नाकारली तसेच मला पैशांची मागणी करण्यात आली. ती पूर्ण करू न शकल्याने मला परत पाठविण्यात आले.
- बन्सी तराळ, शेतकरी

Web Title: Nafed has given advice on how to dry the tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.