पुढील आठवड्यात नाफेडची खरेदी

By admin | Published: May 10, 2017 12:02 AM2017-05-10T00:02:05+5:302017-05-10T00:02:05+5:30

३१ मेपर्यंत मुदत : तूर्तास केंद्रावरील तुरीची राज्य शासनाद्वारा मोजणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्रांना ३१ मेपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी ....

Nafed purchase next week | पुढील आठवड्यात नाफेडची खरेदी

पुढील आठवड्यात नाफेडची खरेदी

Next

३१ मेपर्यंत मुदत : तूर्तास केंद्रावरील तुरीची राज्य शासनाद्वारा मोजणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्रांना ३१ मेपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी केली. प्रत्यक्षात ही खरेदी नाफेडद्वारा पुढील आठवड्यात होणार आहे. तोवर केंद्रावर असलेली तूर राज्य शासनाद्वारे खरेदी केली जाईल.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या घरी किमान चार लाख क्विंटल तूर पडून आहे. शासकीय खरेदी केंद्र २२ एप्रिलपासून बंद करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यामुळे शासनाने केंद्रावर टोकन दिलेल्या व नोंद केलेल्या तुरीची पडताळणी केल्यानंतर राज्य शासनाद्वारे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सद्यस्थितीत राज्य शासनाद्वारा खरेदीदार यंत्रणा असणाऱ्या व्हीसीएमएफ व डीएमओद्वारा सहा हजार ४५४ शेतकऱ्यांची १,३५,७३२.८५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे केंद्रावर १५८ शेतकऱ्यांची २३३१.८१ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर ४०५ शेतकऱ्यांची ७८४४.५४, मोर्शी ३९० शेतकऱ्यांची ७१६८.५२, अमरावती ७११ शेतकऱ्यांची २१,९१६ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ५४१ शेतकऱ्यांची ९७७६, अचलपूर केंद्रावर १०६४ शेतकऱ्यांची २१९०६, अंजनगाव सुर्जी येथे ८४९ शेतकऱ्यांची १५३९०, चांदूरबाजार

तूर मोजणीच्या प्रतीक्षेत
अमरावती : येथे ७२६ शेतकऱ्यांची १५५०१, दर्यापूर केंद्रावर ८८६ शेतकऱ्यांची २१९९७, वरूड केंद्रावर ६५२ शेतकऱ्यांची ११०८४ व धारणी केंद्रावर ७२ शेतकऱ्यांची ८१५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. अद्याप ८३३४ शेतकऱ्यांची १,३६,७५२ क्विंटल तूर खरेदी व मोजणीच्या प्रतीक्षेत असून ही सर्व खरेदी राज्य शासनाद्वारा करण्यात येणार आहे. २२ एप्रिलनंतर ज्या शेतकऱ्यांची नोंद झाली किंवा होईल, त्यांची तूर खरेदी नाफेडद्वारा करण्यात येणार आहे. राज्यभर तुरीचा विषय गाजत असून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची माहिती दिली आहे

अद्याप १.३६ लाख क्विंटल
तूर खरेदी बाकी
सद्यस्थितीत सर्वच १० केंद्रांवर ८३३४ शेतकऱ्यांची १,३६,७३२ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यात २७३५ शेतकऱ्यांची २७,६९८.४६ क्विंटल, अचलपूर १३१५ शेतकऱ्यांची २५४२०, चांदूररेल्वे १७ शेतकऱ्यांची ७३०.१९, नांदगाव ६३७ शेतकऱ्यांची ६५५.४६, मोर्शी १७० शेतकऱ्यांची ११५३७.४८, अमरावती १९०९ शेतकऱ्यांची २४०८४.५३, धामणगाव ४२ शेतकऱ्यांची ११४७३.४४, अंजनगाव २७७ शेतकऱ्यांची ६३१२.६५, चांदूरबाजार ८८४ शेतकऱ्यांची ४३३३.४८, वरूड ३३० शेतकऱ्यांची २२००७ व धारणी केंद्रावर १०२ शेतकऱ्यांची २५०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

आतापर्यंत शासनाची
४.८८ लाख क्विंटल खरेदी
नाफेड तसेच राज्य शासनाद्वारा आतापर्यंत २३ हजार १९१ शेतकऱ्यांची ४,८८,१६८.४६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे केंद्रावर २४४३६.८४ क्विंटल, नांदगाव १६९०१.६८, मोर्शी ३६९७६.५५, अमरावती ६६९८८.०५, धामणगाव ४२२३५.२८, अचलपूर ७५५६३.२५, अंजनगाव ४४८८९.०९, चांदूरबाजार ३७११६, दर्यापूर ९१०२३.०४, वरूड ४९४७४.५० व धारणी केंद्रावर २५६३.१८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

केंद्र शासनाद्वारा पूर्वीच्याच केंद्रावर ३१ मेपर्यंत तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, तूर्तास २२ एप्रिल रोजी ज्या शेतकऱ्यांची नोंद झाली त्यांची तूर खरेदी राज्य शासनाद्वारा करण्यात येत आहे.
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक

Web Title: Nafed purchase next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.