नाफेडच्या सबएंजटांनी लावली शेतकऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:01 PM2018-06-23T22:01:42+5:302018-06-23T22:02:09+5:30

नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले.

Nafed subways in Gujarat | नाफेडच्या सबएंजटांनी लावली शेतकऱ्यांची वाट

नाफेडच्या सबएंजटांनी लावली शेतकऱ्यांची वाट

Next
ठळक मुद्देतूर, हरभऱ्याची खरेदी : निकटस्थांसह व्यापाऱ्यांचा फायदा; अमरावती, अचलपूर तालुक्यात गुन्हे नोंदविले, चांदूरबाजार रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले. निकटस्थांना व व्यापाऱ्यांना फायदा देण्यासाठी केलेली हेरफेर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच ओळखून गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिल्याने या ठगबाजांच्या मोठ्या साखळीचा उलगडा होणार आहे.
गतवर्षीच्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. नाफेडच्या केंद्रावरही मोठ्या प्रमाणात हमीभावाने खरेदी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील गोदामे पूर्ण भरली असल्याने यंदा केंद्रांवर खरेदीची गती वाढलीच नाही. त्यामुळे आॅनलाइन नोंदणी केलेले अर्धेअधिक शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले. त्यामुळे निकटस्थांना लाभ देण्यासाठी व अर्थपूर्र्ण संबंधातून व्यापाऱ्यांची तूर विकली जावी, यासाठी सबएजंट संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाºयांना हाताशी धरून खेळी केली.
शेतकऱ्यांना यामध्ये एसएमएस न पाठविता क्रमवारी डावलून व नोंदणी रजिस्टरवर खोडतोड करून काही ठिकाणी जागा कोऱ्या ठेवून संबंधितांना फायदा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नोंदणी केलेला शेतकरी वंचित राहिल्याने काही शेतकºयांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिलेत. यामध्ये सद्यस्थितीत अचलपूर व अमरावती तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी आणि शेतकºयांच्या क्रमवारीमध्ये गोंधळ असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला. याप्रकरणी त्यांनी सबएजंट असणाºया आणि दोषी असलेल्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणात पोलिसांनी काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली. मात्र, या प्रकारामुळे शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले आहेत, तर काही शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानापासूनदेखील वंचित राहण्याची शक्यता आहे.
शासन अनुदानातही व्यापाऱ्यांना फायदा
जिल्ह्यात तुरीची ३६,६९९ व हरभऱ्याची २३,७९२ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीअभावी घरीच पडून राहिला. १५ मेपासून तूर, तर १३ जूनपासून हरभऱ्याची शासन खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेल्या किमान ६० हजार शेतकऱ्यांचा तूर व हरभरा अद्याप खरेदी करायचा आहे. या शेतकऱ्यांना आता दोन हेक्टर मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान शासन देणार आहे. यामध्येही व्यापारांचाच अधिक फायदा आहे.
व्यापाऱ्यांनीच लावला लाखोंचा चुना
खासगी बाजारात तुरीला हमीभावापेक्षा दोन हजारांनी कमी भाव व त्यातही गावागावांत त्यापेक्षा कमी भाव असल्याने काही स्थानिक व्यापाऱ्यांनी गावातून तुरीची खरेदी केली व शेतकऱ्यांच्या नावाआड विक्री केली. मात्र केंद्रावर खरेदीची गती मंदावल्यामुळे खरेदी केलेली तूर विकली जात नसल्याने त्यांनी सबएंजट संस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना हाताशी पकडून जो घोळ केला, तोच आता अंगलट आलेला आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिलेत. चांदूरबाजारचीही तक्रार आहे. तेथेही चौकशी करण्यात येईल.
- अभिजित बांगर जिल्हाधिकारी

Web Title: Nafed subways in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.