दोन मुंगसांच्या हल्ल्यात नाग जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:28 PM2017-10-28T23:28:09+5:302017-10-28T23:30:50+5:30

तपोवन रोडच्या मधोमध दोन मुंगसांनी नागाला घेरले होते. त्यांच्यातील लढाईचा थरार पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Nagak injured in two attack in the area | दोन मुंगसांच्या हल्ल्यात नाग जखमी

दोन मुंगसांच्या हल्ल्यात नाग जखमी

Next
ठळक मुद्देसर्पमित्रांकडून जीवदान : तपोवन मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तपोवन रोडच्या मधोमध दोन मुंगसांनी नागाला घेरले होते. त्यांच्यातील लढाईचा थरार पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मुंगसांच्या हल्ल्यात नागाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. तेथे पोहोचलेल्या सर्पमित्रांनी नागावर उपचार करून त्यास जीवदान दिले.
तपोवन गेटच्या आतील रस्त्यावरील नाल्याजवळ दोन मुंगूस आणि एका नागाची आमनसामने लढाई सुरू होती. मुंगूस नागावर हावी होत होते, तर नाग फणा काढून त्यांचा हल्ला परतवत होता. ही लढाई त्या मार्गाने जाणारे नागरिकांचे कुतूहलाने पाहत होते. बघ्यांची गर्दी वाढल्यावर झालेल्या गोंधळामुळे दोन्ही मुंगसांनी पळ काढला. मुंगसाच्या हल्ल्यात नागाच्या जबड्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने तो तेथून दूर जाऊ शकला नाही. या घटनेची माहिती त्याच परिसरातील रहिवासी सर्पमित्र भूषण गवळींना मिळाली. त्यांनी तत्काळ कार्स या प्राणिमित्र संस्थेचे पदाधिकारी चेतन भारती यांना कळविले.
चेतन भारती यांनी त्यांचे सहकारी शुभम गिरी, अक्षय देशमुख, अभय साखरकर, शुभम भोमे, अनुराग बाराहाते यांनी घटनास्थळी पाठविले. त्यांनी जखमी नागाला ताब्यात घेऊन वन्यजीव अभ्यासक व कार्सचे पदाधिकारी राघवेंद्र नांदे यांच्याकडे नेले. त्यांनी नागाची स्थिती पाहून सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी अशोक किनगे यांच्याकडे उपचारासाठी पाठविले. यावेळी चेतन भारती, अक्षय निखरे, सिराज तेथे उपस्थित होते. किनगे यांनी नागाच्या फाटलेल्या तोंडाच्या खालच्या जबड्याला दोन टाके लावले, तसेच जबड्याचे ड्रेसिंग करून इंजेक्शन दिले. त्यानंतर नागाला चेतन भारतीच्या स्वाधीन केले. शनिवारी सापाला पुन्हा ड्रेसिंगकरिता किनगे यांच्याकडे नेले होते.
कवड्या सापाला सोडले जंगलात
पोटे टाऊनशिपजवळ जखमी अवस्थेत आढळून आलेल्या कवड्या सापाला कार्सच्या सर्पमित्रांना जीवनदान देऊन शनिवारी जंगलात सोडले. त्या सापाच्या अंगावरून वाहन गेल्याने तो जखमी झाला होता. उपचारानंतर तो साप पूर्णपणे बरा झाला असून, आता त्या सापाला जंगलात सोडण्यात आले आहे.

Web Title: Nagak injured in two attack in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.