निवृत्तीनगरातील घाणीकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:58+5:302021-07-30T04:12:58+5:30
तिवसा : शहरातील अशोकनगर स्थित निवृत्तीनगरात राहणाऱ्या जनतेला गटाराच्या छायेत आपले जीवन व्यतीत करावे लागत असल्याने आरोग्याच्या चिंतेने ...
तिवसा
: शहरातील अशोकनगर स्थित निवृत्तीनगरात राहणाऱ्या जनतेला गटाराच्या छायेत आपले जीवन व्यतीत करावे लागत असल्याने आरोग्याच्या चिंतेने ते भयग्रस्त झाले आहेत. शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने अस्वछतेने कळस गाठला असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
निवृत्तीनगरीत राहणाऱ्या नागरिकांना चिखलातून रस्ता काढावा लागत आहे. त्यातच शेणखताचे ढिगारेही मोठ्या प्रमाणात जागोजागी आहेत. पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती विहिरींमध्ये या साचलेल्या गटाराचे पाणी झिरपत असल्याने पाणी समस्या तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात काहींना साथीचे रोगांनी ग्रासले आहे. या भागात नाली व रस्ता होण्याबाबत व येथील समस्यांबाबत अनेकदा नागरिकांनी नागरपंचयतला निवेदन देण्यात आले असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. या वस्तीत आज तरी रस्ता पार करणे कठीण बनले असून, आरोग्याच्या दृष्टीने याची दखल घेणे आवश्यक ठरले आहे. या भागातील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे.