नागपूर-पुणे दरम्यान धावणार ‘हमसफर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:50 AM2019-02-08T00:50:49+5:302019-02-08T00:53:47+5:30

रेल्वे मंत्रालयाने नागपूर-पुणे हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अजनी ते पुणे दरम्यान केवळ पाच स्थानकांवर ही रेल्वे गाडी थांबणार असून, बडनेरा स्थानकाचा यामध्ये समावेश आहे.

Nagpur-Pune will run between 'Hamsafar' | नागपूर-पुणे दरम्यान धावणार ‘हमसफर’

नागपूर-पुणे दरम्यान धावणार ‘हमसफर’

googlenewsNext
ठळक मुद्देपाच रेल्वे स्थानकांवर थांबा : उन्हाळ्यात प्रवाशांसाठी लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे मंत्रालयाने नागपूर-पुणे हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अजनी ते पुणे दरम्यान केवळ पाच स्थानकांवर ही रेल्वे गाडी थांबणार असून, बडनेरा स्थानकाचा यामध्ये समावेश आहे.
पुणे ते नागपूर दरम्यान सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने १५ नोव्हेंबर रोजी जारी केली. त्यानुसार ही रेल्वे गाडी सुरू झाली आहे. पुणे-नागपूर, नागपूर -पुणे व अजनी-पुणे, पुणे-अजनी अशा चार फेऱ्या ही रेल्वे गाडी करेल. नागपूर, अजनी, बडनेरा, भुसावळ, मनमाड व दौंड असे थांबे या रेल्वे गाडीकरिता निश्चित करण्यात आले आहेत.
नागपूर-पुणे दरम्यान ये-जा करण्यासाठी ही गाडी प्रवाशांना अतिशय सुकर ठरणार आहे. पुणे - नागपूर (गाडी क्रमांक ११४१९) गुरुवारी रात्री १० वाजता पुणे येथून सुटेल. दौंड रेल्वे स्थानकावर रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. ही गाडी मनमाड येथे पहाटे ३ वाजून ४० मिनिटे, तर भुसावळ येथे सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. बडनेरा येथे सकाळी १० वाजून २२ मिनिटे, तर नागपुरात दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे.
पुणे-अजनी (गाडी क्रमांक ११४१७) ही गाडी पुणे येथून रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सुटेल. दौंड रेल्वे स्थानकावर ही गाडी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल. पुढे मनमाड येथे रात्री २ वाजून ५० मिनिटे, भुसावळ येथे पहाटे ५ वाजून २५ मिनीटे, बडनेरा येथे सकाळी ८ वाजून ५५ मिनिटे तर अजनी रेल्वे स्थानकावर सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

शटल बंदचा फटका
राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल निर्मिती होत आहे. त्यामुळे अमरावती-बडनेरा शटल रेल्वे दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना शटलऐवजी बस, आॅटोरिक्षाने घर गाठावे लागत आहे.

Web Title: Nagpur-Pune will run between 'Hamsafar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.