नागठाणा प्रकल्पातून
By admin | Published: April 12, 2015 12:28 AM2015-04-12T00:28:25+5:302015-04-12T00:28:25+5:30
तालूक्यात दरवर्षी चुडामण नदीवर असलेल्या नागठाणा १ आणि २ या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. ...
लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
वरूड : तालूक्यात दरवर्षी चुडामण नदीवर असलेल्या नागठाणा १ आणि २ या प्रकल्पातून पाणी सोडले जाते. यामुळे बंधारे, विहिरी तसेच जलसाठे कोरडे होत नाही. याकरीता चुडामण नदीमध्ये तीन दिवसांपासून नागठाणा २ या प्रकल्पातून पाणी सोडले. परंतु अधिक काळ लोटूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेले गेट बंद होत नसल्याने सर्व प्रयत्न असफल झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला गेट बंद करण्याची मागणी केली. मात्र पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
तालुक्यातील नदी, बंधारे, विहिरींमध्ये जलस्तर कायम राहावा आणि पाणी टंचाई निर्माण हाऊ नये म्हणून दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये पाणी सोडण्यात येते. यावर्षी नदीकाठच्या झटामझिरी, तिवसा, पिंपळशेंडा, वरुड, राजुराबाजार, वाडेगाव, काटी, गाडेगावासह आदी गावालगतच्या शेतातील विहिरंची भूजल पातळी घटली होती. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. आ. अनिल बोंडे यांच्याकडेसुध्दा मागणी केल्याने आमदारांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला. यामुळे ेचुडामण नदीत पाणी सोडण्यात आले. परंतु ठरावीक कालावधीनंतर गेट बंद करणे आवश्यक असते. परंतु इनटेक विहिरींच्या गेटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने सदर गेट बंद होत नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र तारेवरची कसरत करुन गेट बंद झाले नाही. यामुळे लाखो लिटर पाण्याचा विसर्ग सुरुअसल्याने प्रकल्पातील जलसाठा सेंकदागणिक कमी होत आहे.
प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासूनच या गेटमध्ये तांत्रिक बिघाड आहे. या प्रकल्पाचे परिसरात असलेल्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन तातडीने गेट बंद करण्याची मागणी केली आहे. वृत्त लिहिपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरुच होता. गेट बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपडसुध्दा सुरु होती, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)
नागरिकांच्या मागणीवरुन गेट उघडले होते
पाटंबणारे विभागाचे अभियंता देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्कसाधला असता आम्ही प्रकल्पाचे गेट बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आज गेट बंद होईल, असे सांगितले. काटी, वाडेगावच्या नागरिकांच्या मागणीवरुनच गेट उघडण्यात आल्याचेही अभियंता देशपांडे यांनी सांगितले.