१८ हजाराची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार ट्रॅप

By प्रदीप भाकरे | Published: October 17, 2022 08:35 PM2022-10-17T20:35:30+5:302022-10-17T20:35:46+5:30

लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

Naib Tehsildar Trap while accepting bribe of 18 thousand | १८ हजाराची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार ट्रॅप

१८ हजाराची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार ट्रॅप

Next

परतवाडा: अचलपूर तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार शंकर श्रीराव यांना १८ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारला सायंकाळी ताब्यात घेतले. चार दिवसापूर्वी श्रीराव यांनी रेतीचा ट्रक पकडला. हा ट्रक तहसील कार्यालय परिसरात उभा आहे. रेती तस्करीत पकडल्या गेलेल्या या ट्रकची कागदपत्रे-माहिती आरटीओ विभागाला न पाठविण्याबाबत त्यांनी संबंधिताला २० हजार रुपये लाच मागितली होती.

दरम्यान संबंधिताने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. अचलपूर तहसील कार्यालयात स्वतःच्या केबिनमध्येच १८ हजाराची लाच स्वीकारताना खुर्चीत बसलेल्या श्रीराव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वात अमरावती घटकाने ही कारवाई केली.

Web Title: Naib Tehsildar Trap while accepting bribe of 18 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.