निंभोऱ्यात इसमाची गळा दाबून हत्या

By Admin | Published: November 29, 2015 12:55 AM2015-11-29T00:55:51+5:302015-11-29T00:55:51+5:30

रात्री घरी विश्रांती घेत असलेल्या एका ४८ वर्षीय इसमाची अज्ञात इसमाने गळा दाबून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी निंभोरा बोडखा येथे उघडकीस आली़ ....

In the name of Agha, he was thrown by murder | निंभोऱ्यात इसमाची गळा दाबून हत्या

निंभोऱ्यात इसमाची गळा दाबून हत्या

googlenewsNext

परिसरात आढळली दोरी : गुन्हे शाखेचे पथक दाखल
धामणगाव (रेल्वे) : रात्री घरी विश्रांती घेत असलेल्या एका ४८ वर्षीय इसमाची अज्ञात इसमाने गळा दाबून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी निंभोरा बोडखा येथे उघडकीस आली़ घटनास्थळी दोरीचा तुकडा आढळून आला. दरम्यान, गुन्हे शाखेचे पथक सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले.
गजानन रामकृष्ण बढीये असे मृताचे नाव आहे. गावात ते एकटेच राहत होते. शनिवारी सकाळी गजाननचे नातेवाईक चहा देण्यासाठी गेले असता त्याचा खाटेवर मृतदेह आढळला़ मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या माहितीनुसार, गजाननचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर पत्नीने सोडचिठ्ठी दिल्यावर तो घरी एकटाच राहत होता़ गजाननला तीन भाऊ असून ते गावातच शेजारी राहतात. गजाननचे वडील रामकृष्ण बढीये यांनी तीन एकर शेती मृत्यूपूर्वी गजाननच्या नावे करून दिली होती़ ही शेती नातेवाईकाला मक्त्याने देत असत़ मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गजानननच्या हत्येसंदर्भात अज्ञात इसमाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ मृतदेह पुलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दुपारी ४ वाजता पाठविण्यात आला आहे़ प्रभारी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तथा चांदूररेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजाराम सामी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे़ गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ घटनेचा अधिक तपास मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार अमित वानखडे करीत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: In the name of Agha, he was thrown by murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.