नामांतराची पसरली लाट

By admin | Published: April 8, 2015 12:16 AM2015-04-08T00:16:18+5:302015-04-08T00:16:18+5:30

नावात काय आहे, असा सवाल जगप्रसिध्द लेखक, नाटककार शेक्सपिअर यांनी केला होता़ असे असले तरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत स्वत:चे नाव...

The name extends the wave | नामांतराची पसरली लाट

नामांतराची पसरली लाट

Next

संख्याशास्त्रामुळे क्रे झ : दोन हजार नागरिकांच्या नावात बदल
मोहन राऊत  अमरावती
नावात काय आहे, असा सवाल जगप्रसिध्द लेखक, नाटककार शेक्सपिअर यांनी केला होता़ असे असले तरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत स्वत:चे नाव, आडनाव बदलविण्याची जणू लाटच आली आहे़ तब्बल दोन हजार नागरिकांनी त्यांची नावे बदलविली आहेत़ संख्याशास्त्रामुळे नाव बदलविण्याची के्रझ निर्माण झाली आहे़
विवाह झाल्यानंतर माहेरकडील वडिलांचे नाव व आडनाव बदलवून पतीचे नाव तसेच आडनाव लावण्याची पद्धती आजही कायम आहे़ एखाद्या गृहस्थाला मूल दत्तक घेतल्यानंतर आपले नाव, आडनाव लावण्यासाठी थेट अर्ज करावे लागतात. मात्र आता दिवसेंदिवस शकून, अपशकून याबरोबरच संख्याशास्त्रामुळे नाव बदलण्याची के्रझ वाढली आहे़ मागील चार वर्षांत नागपूर येथील शासकीय मुद्राणालयात आपले नाव बदलविण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत़ त्याप्रमाणे आता नाव बदलून गव्हर्मंेन्ट गॅजेटमध्ये नवी नावे आली आहेत़ ज्यांना त्यांच्या कार्यात म्हणावे तितके यश संपादन करता आले नाही़ वयाची चाळीसी गाठली; परंतु लग्न जुळले नाही, नोकरी व कामधंदा नाही, लग्न झाले परंतु मुले झाली नाहीत, अशा विविध कारणांमुळे तरूण युवक, युवती यांनी संख्याशास्त्रावरून भविष्य सांगणाऱ्यांचे उंबरठे झिजवून नाव बदलविले आहे़ नाव बदलविल्यामुळे त्यांची स्वाक्षरीही बदलल्याचे दिसून येते़ नाव, स्वाक्षरी बदलविल्यामुळे जीवनात विलक्षण बदल झाला असल्याचे एका नाव बदलविलेल्या युवकाने सांगितले़ नाव बदलविणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.

ईश्वराच्या नावाला महत्त्व
मागील अनेक पिढ्यांपासून घरात जन्मलेल्या मुलांचे नाव राम, वासुदेव, लक्ष्मण, जयराम, श्रीकृष्ण असे ईश्वराचे तर मुलींचे नाव मीरा, सीता, मुक्ता, असे नाव ठेवण्याची पद्धत होती़ यामागील मुख्य कारण म्हणजे दररोज आपल्या मुलांच्या नावामुळे ईश्वराचे नाव आपल्या मुखातून निघेल अशी श्रद्धा होती़ आता सिनेमातील कलाकारांचे नाव ठेवण्याची के्रझ आली असल्याचे विरूळ रोंघे येथील जोशी यांनी सांगितले़

Web Title: The name extends the wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.