विद्यापीठाच्या लोककला विभागाला अण्णाभाऊ साठेंचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:10+5:302021-04-23T04:14:10+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लोककला विभागाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने निर्णय ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लोककला विभागाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने निर्णय घ्यावा, अशी मागणी लहुशक्ती सेना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने केली आहे. १८ जुलैेपर्यंत अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती यंदा राज्यात मोठ्या थाटात साजरी केली जाणार आहें. हे वर्ष अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीचे वर्षही आहे. शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरवले नसले तरीही त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याचा नावलौकिक म्हणून विद्यापीठाच्या प्रादर्शित लोककला विभागाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासंदर्भात मनीष गवई यानी अधिसभेमध्ये मागणी केली होती. याविषयावर व्यवस्थापन परिषदेने हा धोरणात्मक निर्णय असल्याकारणाने हा प्रस्ताव स्थगित ठेवला आहे. परंतु याबाबत व्यवस्थापन परिषदेने पुन्हा आपल्या निर्णयावर विचार करावा आणि १८ जुलै अण्णाभाऊ साठेच्या पुण्यतिथीपर्यंत स्थगित प्रस्तावाला मंजूर करून अण्णाभाऊ साठेच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठाच्या लोककला विभागाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासंदर्भात घोषणा करावी, अशी मागणी राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनिष गवई यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
००००००००००००००००