नेटवर्क मार्केंटिंगच्या नावावर युवकाला पावनेतीन लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:52+5:302021-07-04T04:09:52+5:30

अमरावती : इप्राईमसेल नावाच्या ऑनलाईन चेन मार्केंटिंग (नेटवर्क मार्केंटिंग) मध्ये परिवारातील सदस्यांना पैसे गुंतवविण्यास सांगून युवकाला २ लाख ८१ ...

In the name of network marketing, the youth lost Rs 53 lakh | नेटवर्क मार्केंटिंगच्या नावावर युवकाला पावनेतीन लाखांनी गंडविले

नेटवर्क मार्केंटिंगच्या नावावर युवकाला पावनेतीन लाखांनी गंडविले

Next

अमरावती : इप्राईमसेल नावाच्या ऑनलाईन चेन मार्केंटिंग (नेटवर्क मार्केंटिंग) मध्ये परिवारातील सदस्यांना पैसे गुंतवविण्यास सांगून युवकाला २ लाख ८१ हजारांनी फसविल्याची घटना वहेदत कॉलनीत १९ सप्टेंबर २०२० ते २ जुलै २०२१ दरम्यान घडली.

याप्रकरणी शहर सायबर पोलिसांनी इप्राईमसेलचे संचालक मनोज कमलाकर कापसे (रा. कापसे प्लॉट नंबर ८३ खरबी रोड नागपूर, उत्तम आनंद पटेल (रा. इंद्रमात नगर नागपूर, पुष्पक किशोर पटेल (रा. साई कॉलनी तिरोरा जि. गोंदिया व एका महिलेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदानुसार शुक्रवारी नोंदविला.

याप्रकरणी फिर्यादी इमरान खान मकसूद अली खान (रा. वहेदत कॉलनी वलगाव रोड) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. फिर्यादी यांनी इप्राईमसेल कंपनीच्या साईडवर फिर्यादी व त्याची पत्नी, भाऊ यांनी ऑनलाईन आयडी तयार करून रजिस्टर केले. यामध्ये चेन तयार करून सदर कंपनी त्यांनी तयार केलेल्या मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग एमओयू नियमाचे पालन न करता युवकाचे २ लाख ८१ हजार ९०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर करीत आहेत.

बॉक्स

अमरावतीत ५० जणांची फसवणूक

इप्राईमसेलच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या फिर्यादींनी तक्रार दिली असून अमरावतीतील ५० नागरिकांचीसुद्धा फसवणूक झाल्याचे निवेदन पोलीस आयुक्त आरती सिंह यांना प्राप्त झाले असून, त्यांनी सदर तक्रार वजा निवेदन सायबर सेलकडे वर्ग केल्याची माहिती आहे. कंपनीकडे प्रत्येकाने यात मेंबरशिप केली असून, याची चौकशी झाल्यास यात कोट्यवधींची गुंतवणूक असण्याची शक्यता तक्रारकर्त्यांनी वर्तविली आहे.

Web Title: In the name of network marketing, the youth lost Rs 53 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.