स्काय वॉकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, मात्र अडथळे दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:35+5:302021-06-25T04:11:35+5:30

नवनीत राणा यांचे आदित्य ठाकरे यांना पत्र, राज्याच्या पर्यटन मंत्र्यांकडे मागणी चिखलदरा : देशातील पहिल्या स्काय वाॅकला शिवसेनाप्रमुखांचे ...

Name the Sky Walk after the Shiv Sena chief, but remove the obstacles | स्काय वॉकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, मात्र अडथळे दूर करा

स्काय वॉकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, मात्र अडथळे दूर करा

Next

नवनीत राणा यांचे आदित्य ठाकरे यांना पत्र, राज्याच्या पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

चिखलदरा : देशातील पहिल्या स्काय वाॅकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, आमची काही हरकत नाही. परंतु रखडलेला प्रकल्प मार्गी लावा, असे पत्र खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना दिले आहे. अडीच वर्षापासून रखडलेल्या चिखलदरा येथील देशातील पहिल्या स्काय वॉकच्या कामासाठी खासदार नवनीत राणा यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून परवानगी व निधीसंदर्भात मागणी केली आहे.

विदर्भातील अप्रतिम सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे मेळघाटातील चिखलदरा. चिखलदरा म्हणजे विदर्भातील जनतेसाठी थंड हवेचे ठिकाण (हील स्टेशन) विदर्भाचा विकास जलदगतीने होत असल्याची भावना तत्कालीन सरकारच्या कारकिर्दीत होती. आज ही भावना दिसत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

चिखलदऱ्याला हजारो पर्यटक दरवर्षी येतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. तत्कालीन सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्काय वॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. सिडकोकडून त्याची उभारणी केली जात असून, गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉइंट दरम्यान ४०७ मीटर लांबीच्या या स्कायवॉकच्या उभारणीवर ३८ कोटी रुपये खर्च येणार आहे. जून २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण त्याचे काम अर्धवट आहे. या स्काय वॉकवर उभे राहून पर्यटकांना चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळता येईल. त्यावरील काचेच्या प्लॅट फॉर्मवर उभे राहून ५०० फूट खोल दरीचेही दर्शन घडणार आहे.

बॉक्स

विदर्भाकडे लक्ष द्या

आदित्य ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. तसेच विदर्भाकडेही लक्ष द्यावे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. हा स्काय वॉकही तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने याकडे लक्ष देऊन स्काय वॉकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्यायला आमची हरकत असणार नाही, असेही खासदार नवनीत राणा यांनी पत्रातून म्हटले आहे.

बॉक्स

पोलिसांतून सुटले वनविभागात अडकले

स्काय वॉकचे काम आधी पोलीस दलाच्या वायरलेस यंत्रणेकडून आक्षेप घेतल्याने अडविले गेले आणि कित्येक दिवस ते बंदच होते. त्या कचाट्यातून कसेबसे सुटले तर आता वन विभागांतर्गत वन व वन्यजीव मंडळाच्या कचाट्यात अडकलेले आहे. वनखाते सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे वडिलांकडे हट्ट धरून आपण हे काम मार्गी लावू शकता, असे खासदार राणा म्हणाल्या.

-----------

आादिवासींना न्याय द्या

चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा टर्निंग पॉइंट ठरेल, अशा या स्काय वॉकचे काम पर्यटनमंत्री म्हणून आपण पूर्ण केल्यास तेथील गोरगरीब आदिवासींना वाढत्या पर्यटनातून रोजगाराची संधी मिळेल, अशी अपेक्षा खा. नवनीत राणा यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्रातून वर्तविली आहे.

Web Title: Name the Sky Walk after the Shiv Sena chief, but remove the obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.