जप्त मालमत्ता महापालिकेच्या नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:59 PM2018-02-25T22:59:06+5:302018-02-25T22:59:06+5:30

वारंवार नोटीस देऊनही थकीत कर न भरणाऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा धाडसी निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्या मालमत्ता घेण्यास कुणी समोर न आल्यास त्या आयुक्तांच्या नावे करण्याची प्रक्रिया आरंभण्यात आली आहे.

Names of seized property corporation | जप्त मालमत्ता महापालिकेच्या नावे

जप्त मालमत्ता महापालिकेच्या नावे

Next
ठळक मुद्देआज लिलाव : २० कोटींचे ‘टार्गेट पूर्ण करण्याची धडपड

आॅनलाईन लोकमत
अमरावती : वारंवार नोटीस देऊनही थकीत कर न भरणाऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा धाडसी निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्या मालमत्ता घेण्यास कुणी समोर न आल्यास त्या आयुक्तांच्या नावे करण्याची प्रक्रिया आरंभण्यात आली आहे. सोमवार, २६ फेब्रवारीला २५ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. राजापेठ झोन कार्यालयात ही लिलाव प्रक्रिया दुपारी ४ वाजेपासून सुरू होईल.
महापालिकेचे मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. परंतु, यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. याशिवाय मोबाईल टॉवर व बँकांनीही महापालिकेला ठेंगा दाखविला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाची कराची एकूण मागणी ४७.२२ कोटी रुपये असताना महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत केवळ २५ ते २६ कोटी रुपये आल्याने अवघ्या महिनाभरात २० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याचे आाव्हान महापालिका प्रशासनासमक्ष उभे ठाकले आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रातील ६९९ मालमत्तांवर जप्तीची टाच आणण्यात येणार आहे.
झोन क्रमांक १ मधून ११९७ मालमत्ता जप्तीच्या नोटीस दिल्या होत्या. त्यापैकी प्रथम टप्प्यात ४४४ मालमत्तांचा लिलाव होणार आहे. झोन क्रमांक २ मधून ५३९ पैकी १०४ मालमत्तांचा लिलाव होईल. झोन ४ मधून ४६३ पैकी प्रथम टप्प्यात ८७ मालमत्ता लिलावात काढल्या जातील. झोन ५ मधून २२६ पैकी २६ मालमत्तांचे लिलाव करण्यात येणार आहे. रामपुरी कॅम्प झोनमधील ६६ मालमत्तांचा ५ मार्चला जाहीर लिलाव केला जाणार आहे. ५५ लाख ९३ हजार ८२३ रुपये थकबाकीसाठी हा लिलाव होणार असून, सर्वात मोठे थकबाकीदार म्हणून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. या संस्थेने महापालिकेचे ३५.२५ लाख रुपये थकविले आहेत.
राजापेठ झोनने २३ फेब्रुवारीला ६४ मालमत्तांचा लिलाव प्रक्रिया आरंभली. त्यात प्रामुख्याने युनियन बँक ही मालमत्ता होती. मात्र, या बँकेसह अन्य ३८ मालमत्ता धारकांनी लिलावापूर्वी थकीत रक्कम भरल्याने त्यांची नावे लिलावातून वगळण्यात आली. उर्वरित २५ मालमत्तांचा लिलावात कुणीही सहभागी न झाल्याने त्या मालमत्तांसाठी पुन्हा २६ फेब्रुवारीला लिलाव होईल.

महापालिका क्षेत्रातील पाचही झोनअंतर्गत येणाºया थकीत मालमत्ताधारकांची यादी बनविण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी कराचा भरणा त्वरित करावा, अन्यथा त्या मालमत्ता जप्त करुन त्यांचा लिलाव करण्यात येत आहे.
- हेमंत पवार, आयुक्त

Web Title: Names of seized property corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.