राखीतून गुंजणार 'नमो नमो'ची धून
By admin | Published: August 22, 2015 12:41 AM2015-08-22T00:41:33+5:302015-08-22T00:41:33+5:30
भाऊ-बहिणीच्या नात्याची जोपासना करणारा रेशमी बंध अर्थात रक्षाबंधनासाठी विविध आकर्षक रेशमी बंध, संगीतमय राख्यांनी बाजारपेठ सजली आहे.
बाजारपेठ सजली : विविध आकर्षक रेशीमबंध, संगीतमय राख्या
अमरावती : भाऊ-बहिणीच्या नात्याची जोपासना करणारा रेशमी बंध अर्थात रक्षाबंधनासाठी विविध आकर्षक रेशमी बंध, संगीतमय राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. यंदा या उत्सवाचे खास आकर्षण मोदीची नमो नमो म्हणणारी म्युझिकल राखी ठरत आहे. नमो-नमो या संगीताचा जयजयकार आता बालगोपालांच्या हातावरही गुंजणार आहे. दरम्यान आर्थिकसंकटामुळे बाजारपेठेवर असलेले मंदीचे सावट लक्षात घेऊन राख्यांच्या दरात वाढ झालेली आहे.
शनिवार २९ आॅगस्टला रक्षा बंधन आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांची दुकाने सजली आहेत. पारंपरिक देव राखीची जोडी पाच रुपयाला मिळते. रेशीम धाग्याला असलेली गोंडे २० ते ३० रुपये डझन आहेत. वर्कच्या राखीचे अनेक प्रकार असून त्या १० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहेत. त्या खालोखाल मागणी असते. वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही राखी २० रुपयांपासून ४५० रुपये डझन आहे. डायमंड राखी ५ रुपये नगापासून २५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. रक्षाबंधन सणाला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने ग्राहकांची दुकानांमध्ये फारशी गर्दी नाही. मात्र गर्दी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)