महाआवास अभियानात नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:47+5:302021-08-24T04:16:47+5:30
नांदगाव खंडेश्वर : महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत योजनेमध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीने ...
नांदगाव खंडेश्वर : महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत योजनेमध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेत गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाआवास अभियान ग्रामीण २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीसाठी राज्यभरात विविध निकषानुसार तालुक्याचे मूल्यमापन केले होते. या मूल्यमापनात नांदगाव पंचायत समितीला सर्वोत्कृष्ट केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत जिल्ह्यातून द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. याबाबत पंचायत समितीच्या सभापती वैशाली सचिन रिठे व गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांना हा पुरस्कार पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पंचायत समिती अंतर्गत घरकुल लाभार्थींना जागा उपलब्ध करून देणे, गवंडी प्रशिक्षण राबवणे, इतर योजनेची कृती संगम करणे, डेमो हाऊस उभारणी करणे, ‘ड’ यादीतील आधार व जॉब कार्ड मॅपिंग करून घेणे, प्रलंबित राहिलेले घरकुल अडथळे दूर करून विविध उपाययोजना करून पूर्ण करणे असे निकष पूर्ण करणाऱ्या तालुक्यांमध्ये स्पर्धात्मक मूल्यमापन करण्यात आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेसह शासनाच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, सामाजिक दृष्टी कमकुवत घटकांसाठी राबविण्यात येतात. या योजनेत नांदगाव तालुक्यात उत्कृष्ट तालुका पुरस्कार मिळाला. कोरोना कालखंडातही विविध नावीन्यपूर्ण उपक्रम तालुक्यात गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्या मार्गदर्शनात घरकुल विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील गोळे, ई, एफ क्लास जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी विठ्ठलराव जाधव व नितेश अंबोरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पंडित दीनदयाल जागा खरेदी योजनेकरिता संदीप देशमुख व रक्ताच्या नात्यामधून लाभार्थींना जागा उपलब्ध करण्यासाठी विजय कावडे यांनी कामगिरी बजावली.
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक उमेश भोंडे व विजय अळने तसेच ग्रामपातळीवर प्रत्यक्ष काम करणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हितेश लांड, विकी रत्नपारखी, व्यंकटेश दुरकर, अक्षता जळीत, खुशाल कापसे तसेच महाआवास अभियानामध्ये ऑनलाइन माहिती भरण्याचे काम सांभाळणारे मनीष मदनकर व सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व संगणक परिचालकांच्या सहकार्याने या योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
230821\img-20210818-wa0012.jpg
महा आवास योजनेत नांदगाव पंचायत समितीला पुरस्कार.