नांदगाव पेठ एमआयडीसीत औषध निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:22 AM2019-06-10T01:22:18+5:302019-06-10T01:22:43+5:30

नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत हर्मन फिनोकेम कंपनीचे औषधी निर्मिती प्रकल्प लवकरच साकारले जाणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ एकर जागा तत्काळ देण्याचे निर्देश उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. खासदार नवनीत राणा यांच्या मागणीवरून हा प्रकल्प येत आहे.

Nandgaon Peth MDIDC Drug Production Project | नांदगाव पेठ एमआयडीसीत औषध निर्मिती प्रकल्प

नांदगाव पेठ एमआयडीसीत औषध निर्मिती प्रकल्प

googlenewsNext
ठळक मुद्देबेरोजगारांना काम : मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिवांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत हर्मन फिनोकेम कंपनीचे औषधी निर्मिती प्रकल्प लवकरच साकारले जाणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ एकर जागा तत्काळ देण्याचे निर्देश उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. खासदार नवनीत राणा यांच्या मागणीवरून हा प्रकल्प येत आहे.
खासदार म्हणून निवडून येताच नवनीत राणा यांनी बेरोजगारांना काम कसे मिळेल, याचे नियोजन चालविले आहे. गत आठवड्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, याबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी विनंती केली. त्यानुसार नांदगाव पेठ एमआयडीसीत तीन हजार लोकांच्या हाताला काम मिळेल. त्यानुसार औरंगाबाद स्थित हर्मन फिनोकेम या मल्टिनॅशनल कंपनीचे औषध निर्मिती प्रकल्प अमरावतीत साकारण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव, कार्यकारी संचालक एमआयडीसी आणि हर्मन फिनोकेम कंपनीचे संचालक भुपेंद्रसिंह मनहास यांच्यात औषधी निर्मिती प्रकल्प अमरावतीत साकारण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली. जिल्ह्यातील बेरोजगार युवक, युवतींना या उद्योगात रोजगार देण्याबाबत धोरण स्पष्ट करण्यात आले. यावेळी अमरावतीत नवप्रकल्प उभारणीस होकार दर्शविल्याबद्दल राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांचे मनस्वी आभार मानले.

Web Title: Nandgaon Peth MDIDC Drug Production Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं