कोरोना लसीकरणात नांदगाव तालुका माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:21+5:302021-04-23T04:14:21+5:30

तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे अक्षम्य दुर्लक्ष, वीरेंद्र जगतापसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कारवाईची मागणी नांदगाव खंडेश्वर : तालुका कोरोना लसीकरणात माघारला असून, ...

Nandgaon taluka withdrew from corona vaccination | कोरोना लसीकरणात नांदगाव तालुका माघारला

कोरोना लसीकरणात नांदगाव तालुका माघारला

Next

तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे अक्षम्य दुर्लक्ष, वीरेंद्र जगतापसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कारवाईची मागणी

नांदगाव खंडेश्वर : तालुका कोरोना लसीकरणात माघारला असून, तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबराव इंगळे यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तालुक्यातील लसीकरणाचे नियोजन कोलमडून येथे आलेल्या ६३० लसी परत गेल्या. याप्रकरणी वरिष्ठांनी त्वरित कारवाई करून तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली आहे.

पंचायत समिती सभापती वैशाली रिठे, पंचायत समिती सदस्य रणजित मेश्राम, आशा सोनोणे, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे, नगरपंचायतचे माजी आरोग्य सभापती फिरोज खान यांनी देखील तशी मागणी पत्रपरिषदेत केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लसीकरणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. असे असतानाही या महत्त्वपूर्ण उपक्रमात तालुका आरोग्य अधिकारी यांनी कर्तव्य बजावण्यास कसूर केल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी यावेळी केली आहे.

या तालुक्याला लसीकरणाकरिता आजपावेतो ४,१०० लसी प्राप्त झाल्या होत्या. यात ग्रामीण भागात पापळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी १३५०, लोणी केंद्रावर १३५०, मंगरूळ चावाळा केंद्रावर ६००, सातरगाव केंद्रावर ५००, धामक केंद्रावर ३०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. तसेच कोहळा जटेश्वर व हिवरा बु. येथील दोन आरोग्य उपकेंद्र व पळसमंडळ येथील आयुर्वेदिक दवाखाना तसेच वाघोडा हे मोठे गाव असल्याने तेथेही लसीकरणाचे कक्ष उघडले होते. पण तालुक्याला मिळालेल्या लसी पैकी यातील १६९ लसी वेस्टेज गेल्या. नियोजनाअभावी लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावरून ३९० लसी व सातरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावरून २४० लसी अशा ६३० लसी परत गेल्या. काही दिवसांपासून येथे लसीकरणाचे काम ठप्प पडले आहे.

ते गेले रजेवर

गुरुवारी पंचायत समितीची मासिक सभा होती. या सभेत तालुक्यातील कोरोना लसीकरणाचा मुद्दा गाजणार होता. पण, वैद्यकीय अधिकारी यांनी सुट्टीचा अर्ज टाकून ते या महत्त्वपूर्ण सभेला गैरहजर राहिले. तालुक्यात लसीकरणाचा कार्यक्रम गतिमान करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: Nandgaon taluka withdrew from corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.