‘नॅनो टेक्नॉलॉजी’ने सुधारणार जमिनीचा पोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:03 PM2018-11-03T22:03:29+5:302018-11-03T22:03:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पिकांच्या गुणवत्तेत वाढ म्हणजेच पिकांच्या उत्पादनखर्चात कमी होऊन उत्पन्नात भर पाडण्यासाठी आता ‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा ...

'Nano Technology' to Improve Land Ship | ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ने सुधारणार जमिनीचा पोत

‘नॅनो टेक्नॉलॉजी’ने सुधारणार जमिनीचा पोत

googlenewsNext
ठळक मुद्देबायो कॅप्सूलचा वापर : एका कॅप्सूलमध्ये एक लाख कोटी जीवाणू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पिकांच्या गुणवत्तेत वाढ म्हणजेच पिकांच्या उत्पादनखर्चात कमी होऊन उत्पन्नात भर पाडण्यासाठी आता ‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. महाराष्ट्र कृषिविकास महामंडळ व एसआरटी सायन्स (छत्तीसगढ) यांनी नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित (पेटंटेड) बायो कॅप्सुल्सची उपलब्धी ‘अ‍ॅग्रोकमल’ या नावाने शेतकऱ्यांना दिली आहे. एका कॅप्सुल्समध्ये एक लाख कोटी जिवाणू आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात भर पडणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्पाइसेस रिसर्च (आय.सी.ए.आर) या संस्थेनी ही कॅप्सुल प्रमाणीत केलेली आहे. सर्व पिकांच्या व फळवर्गीय झाडांच्या भरघोस वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या तीन प्रकारच्या महत्त्वाच्या गुणधर्मांची आवश्यकता असते. यासोबतच झिंक, बोरॉन, मॅगनीज व फेरस आदी सूक्ष्म मूलद्रव्यांचीदेखील आवश्यकता असते. यासाठी शेतकऱ्यांद्वारे यूरिया, पोटॅश, एस.एस.पी., संयुक्त खते व बाजारात उपलब्ध इतर मूलद्रव्यांच्या वापराने याची गरज पूर्ण करतो. या रासायनिक खतांच्या वापराने जमिनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत आहे. जमीन कडक व ढेकळयुक्त होऊन खेळती हवा न राहिल्यामुळे पाणी टिकून ठेवण्याची क्षमतादेखील कमी झालेली आहे. याचा विपरीत परिणाम सर्व पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर होत आहे. याशिवाय कीटकनाशके व तणनाशकांच्या अधिक वापराच्या परिणामी निसर्गातील जैविक मित्र कीटकांची व मातीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या घटत चालली आहे. एकूणच जमिनीच्या पोतावर परिणाम होऊन नैसर्गिक संतुलनच बिघडलेले आहे. सर्व पिके त्यांना आवश्यक असणारी मूलद्रव्ये ही जमिनीतून मुळाद्वारे शोषून घेतात. मात्र, या सर्व बाबीमुळे पिकांना जमिनीतून हवी असलेली मूलद्रव्ये मिळत नाही. याचा थेट परिणाम पीकवाढ व उत्पासदनावर होतो. या समस्येवर मात करण्यासाठी कृषी उद्योग महामंडळाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बायोकॅप्सुल हा एक सक्षम पर्याय सिद्ध झाला आहे.

बीजप्रक्रिया, जमिनीत ओलावा असताना असे वापरा बायोकॅप्सूल
राजझो कॅप्सुल - द्विदलवर्गीय पिकांसाठी नत्राचा पुरवठा
अ‍ॅझो कॅप्सुल - एकदलवर्गीय पिकांसाठी नत्राचा पुरवठा
पीएसबी प्लस- सर्व पिकांसाठी स्फुरदचा पुरवठा
एनपीके कॅप्सुल - सर्व पिकांसाठी नत्र, स्फुरद व पालाशचा पुरवठा
झिंक ग्रो कॅप्सुल - सर्व तेलवर्गीय पिकांसाठी पालाशचा पुरवठा
पोटॅश ग्रो कॅप्सुल - सर्व पिकांसाठी पालाशचा पुरवठा
अ‍ॅसिटो कॅप्सुल - सर्व पिकांसाठी नत्राचा पुरवठा
एजोस्पेरिलियम कॅप्सुल - सर्व पिकांना नत्राचा पुरवठा
अशी वापरावी बायोकॅप्सूल
एक कॅप्सुल रात्री पाच लिटर पाण्यामध्ये (पाणी गरम करून थंड केलेले) मिसळून ठेवल्याने मिश्रण तयार होते. पेरणीपूर्वी एक लिटर मिश्रणात बियाणे भिजवून सावलीत सुकवावे. उर्वरित मिश्रण दुसºया दिवशी सकाळी २०० लिटर पाण्यात पिकांच्या मुळाशी किंवा जमिनीवर फवारावे. ही फवारणी ठिबक सिंचन व स्पिंकलरद्वारेही करता येते.

बायोकॅप्सुलच्या रूपात जैविक खते हे ‘आयसीएआर’द्वारे विकसित नावीन्यपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान कृषी उद्योग महामंडळाने सर्वप्रथम आणले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादनवाढीची याद्वारे शेतकºयांना संधी आहे.
- सत्यजित ठोसरे, विभागीय व्यवस्थापक
बायोकॅप्सूलचे हे आहेत फायदे
एका बायोकॅप्सूलमध्ये एक लाख कोटी जिवाणू असल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. पिकांच्या गुणवत्तेत वाढ होते. पर्यायाने उत्पन्नात वाढ होऊन उत्पादनखर्च कमी येतो. जमिनीची पाणीधारण करण्याची क्षमता वाढून पोत सुधारतो. एका एकरासाठी एका वेळी फक्त एका कॅप्सुलची आवश्यकता असते. बायोकॅप्सुलमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व जैविक असल्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकविण्यास मदत होते. मुळांची वाढ होऊन कार्यक्षमता वाढते व जमिनीतील उपलब्ध मूलद्रव्ये योग्य प्रमाणात शोषली जातात. बायोकॅप्सुलसोबत प्रॉम व मायक्रोरायझा या जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते.

Web Title: 'Nano Technology' to Improve Land Ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.