'नारायण राणे हे शिवसेनेचे प्रॉडक्ट, स्टंट बाजी-नौटंकी करणे हा त्यांचा जुना धंदा'; कृषीमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 09:34 PM2022-02-20T21:34:03+5:302022-02-20T21:34:15+5:30

'उद्धव ठाकरेंबद्दल काहीतरी बोलायचं आणि भाजपशी जवळीक साधायची, एवढ्यावरच नारायण राणेंचा राजकीय प्रवास थांबला.'

'Narayan Rane is ShivSena's product'; Minister of Agriculture dadaji bhuse slams | 'नारायण राणे हे शिवसेनेचे प्रॉडक्ट, स्टंट बाजी-नौटंकी करणे हा त्यांचा जुना धंदा'; कृषीमंत्र्यांचा टोला

'नारायण राणे हे शिवसेनेचे प्रॉडक्ट, स्टंट बाजी-नौटंकी करणे हा त्यांचा जुना धंदा'; कृषीमंत्र्यांचा टोला

googlenewsNext

अमरावती : भाजपचे उदोउदो करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेचे प्रॉडक्ट आहे. त्यांचा राजकीय जन्मदेखील सेनेतूनच झाला आहे, हे कदापिही विसरू नये. स्टंटबाजी आणि नौटंकी करणे हा राणेंचा जुनाच धंदा, हे आम्हालाही माहिती आहे, असा टाेला राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अमरावती येथे रविवारी लगावला.

दादाजी भुसे हे शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ विभागीय कार्यकर्ता संवाद मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून उपस्थित झाले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गत काही दिवसांपूर्वी ‘माताेश्री’वरील चार जणांवर लवकरच केंद्रीय यंत्रणांकडून नोटीस बजावली जाईल, असे भाकीत वर्तविले होते, या पार्श्वभूमीवर भुसे यांना विचारणा केली असता त्यांनी नारायण राणे यांची ओळख शिवसेना आहे, हे विसरू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबद्दल काहीतरी बोलायचे आणि भाजपशी जवळीक साधायची एवढ्यावरच नारायण राणेंचा राजकीय प्रवास थांबला, असेही भुसे म्हणाले.

आमदार संजय राठोड यांच्याबाबतचा निर्णय लवकरच
माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील वापसीबाबत बोलताना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी राठोड यांचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच घेतील, असे संकेत दिलेत. आमदार संजय राठोड हे सेनेचे जिल्हाप्रमुख, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. ते अगोदर शिवसैनिक असून, त्यांना नक्कीच न्याय मिळेल, असे भुसे म्हणाले. दरम्यान, आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळातील वापसीबाबत विचारले असता ‘नो कॉमेंट्स’ असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.

Web Title: 'Narayan Rane is ShivSena's product'; Minister of Agriculture dadaji bhuse slams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.