शासकीय कार्यालयात नरेंद्र मोदींची अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2016 12:11 AM2016-05-09T00:11:02+5:302016-05-09T00:11:02+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र मुख्यमंत्री, राज्यमंत्री आणि सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात लावण्याचे सुचित करणारा ...

Narendra Modi's Allergy in Government Office | शासकीय कार्यालयात नरेंद्र मोदींची अ‍ॅलर्जी

शासकीय कार्यालयात नरेंद्र मोदींची अ‍ॅलर्जी

Next

शासन निर्णय बासनात : एकाही ठिकाणी लावले नाही छायाचित्र
अमरावती : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र मुख्यमंत्री, राज्यमंत्री आणि सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात लावण्याचे सुचित करणारा शासन निर्णय ६ नोव्हेंबर २०१५ रोजी सर्व कार्यालयांना धडकला आहे.
मध्यवर्ती शासकीय मुद्रणालयात नि:शुल्क छायाचित्र उपलब्ध करून देण्यात आले. असे असतानाही मागील पाच महिन्यांपेक्षा अधिक कलावधी उलटून गेला असतानाही पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही पंतप्रधानाचे नरेंद्र मोदी यांना शासकीय कार्यालयात जागाच मिळालीन नसल्याचे दिसून येते.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची किती अंमलबजावणी होते, याचा आढावा लोकमतने घेतला. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय आदी ठिकाणी प्रशासकीय इमारतीला भेट दिली असता येथील एकाही कार्यालयात नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावलेले दिसले नाही.
शासकीय निमशासकीय कार्यालयात कोणाचे छायाचित्र लावावे याबाबत शिस्त असावी, यासाठी राज्य शासनाने वेळावेळी शासन निर्णय काढलेले आहेत. कोणत्या थोर पुरूषांची छायाचित्रे लावायची याबाबत वेळोवेळी शासन निर्णय काढून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आता ही संख्या २९ वर पोहोचली आहे. शासकीय मुद्राणालयात विनामूल्य छायाचित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या छायाचित्राला फ्रेम करण्याचा खर्च शासक ीय कार्यालयाने मंजूर तरतुदीतून करावा, अशा स्पष्ट सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
वैयक्तीक श्रध्दा बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करून छायाचित्र लावण्यास शिस्त असावी, यासाठी शासनाने शासन निर्णय काढले, महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, फक्रुद्दीन अली अहमद, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, दादाभाई नौरोजी, व्ही.व्ही.गिरी, महात्मा ज्यातीबा फुले, राजीव गांधी,पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ झाकीर हूसेन, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाष चंद्रबोस, वसंतदादा पाटील, डॉ.के.आर. नारायणन, डॉ. एस.राधाकृष्णन, छत्रपती शिवाजी महाराज, अटलबिहारी वाजपेयी, सावित्रीबाई फुले, डॉ मनमोहनसिंग, राजर्षी शाहू महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम,प्रतिभाताई पाटील यांच्या नावाचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
या यादीतील छायाचित्र शासकीय कार्यालयात भिंतीवर झळकायला हवे होते. मात्र वैयक्तिक श्रध्देला स्थान देऊन देवदेवतांचे छायाचित्र लावण्ल्याचे दिसून आले. अनेक कार्यालयांमध्ये शासन निर्णयातील यादीत दिलेल्या छायाचित्रांपेक्षा अन्य थोर पुरूषांचे छायाचित्र लावण्यात आले आहेत.

Web Title: Narendra Modi's Allergy in Government Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.