कृषिसहायक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नरेंद्र पकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:47+5:302021-07-23T04:09:47+5:30

जिल्हा संघटनेची कार्यकारीणी गठीत चांदूर रेल्वे : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषी सहायकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या म.रा. ...

Narendra Pakde as the district president of Krishisahayak Sanghatana | कृषिसहायक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नरेंद्र पकडे

कृषिसहायक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नरेंद्र पकडे

googlenewsNext

जिल्हा संघटनेची कार्यकारीणी गठीत

चांदूर रेल्वे : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषी सहायकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या म.रा. कृषिसहायक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नरेंद्र पकडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

संघटनेच्या स्थापनेपासून सतत सक्रिय सहभाग असलेल्या आणि यापूर्वी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपल्या कामाने कृषिसहायकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या पकडे यांना पुन्हा बिनविरोध निवडून देण्यात आले आहे. सचिवपदी विलास कराळे, कार्याध्यक्ष दीपक पांडे, कोषाध्यक्ष अनिल पोच्छी, उपाध्यक्ष वासुदेव चव्हाण (अमरावती), उपाध्यक्ष योगेश कडू (मोर्शी), उपाध्यक्ष गजेंद्र काळे (अचलपूर) जिल्हा प्रसिध्दीप्रमुख मनोज होले, महिला प्रतिनिधी रुपाली ठाकरे, राज्य प्रतिनिधी संजय येवले, जिल्हा संघटक उपेंद्र इंगोले, सचिन एस. तोटे, प्रमोद बनसोड, सहसचिव नितीन खंडारे यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून उमेश वानखडे, मंगेश सोनोने, सुनील तेलखडे यांनी काम पाहिले.

कोट

कृषि सहायकांच्या न्याय प्रश्नासाठी सतत कार्यरत राहणार असून कृषिसहायकांच्या अडीअडचणी वरिष्ठांकडून सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. कृषिसहायकांच्या मागण्यांसाठी वेळप्रसंगी लढा उभारून संघटना प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

- नरेंद्र पकडे,

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष

Web Title: Narendra Pakde as the district president of Krishisahayak Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.