विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:27 PM2019-03-01T22:27:59+5:302019-03-01T22:28:19+5:30

विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँक सुरू केली जाणार आहे. यात नियमित अभ्यासक्रमासाठी ८० क्रेडिट, तर त्याव्यतिरिक्त इतर अभ्यासेतर उपक्रमांसाठी २० क्रेडिट असे १०० क्रेडिट असणार आहे.

National Academic Credit Bank for Students | विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँक

विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँक

Next
ठळक मुद्देभूषण पटवर्धन : विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवस

अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँक सुरू केली जाणार आहे. यात नियमित अभ्यासक्रमासाठी ८० क्रेडिट, तर त्याव्यतिरिक्त इतर अभ्यासेतर उपक्रमांसाठी २० क्रेडिट असे १०० क्रेडिट असणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेले क्रेडिट नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँकमध्ये जमा होतील. त्याचा विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी खूप फायदा होईल, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन (एन.सी.एस.टी.सी), भारत सरकार व राजीव गांधी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशन, राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठात झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी तथा उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले, एन.एस.डी.चे समन्वयक नितीन फिरके उपस्थित होते.
भौतिकशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे फित कापून पटवर्धन यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक नितीन फिरके, संचालन नीरज घनवटे, तर आभार प्रदर्शन मनीषा कोडापे यांनी केले.

Web Title: National Academic Credit Bank for Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.