बडने-यातील मेघे अभियांत्रिकीला राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 05:28 PM2017-10-04T17:28:52+5:302017-10-04T17:31:29+5:30
अमरावती येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा.राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंटला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आणि स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, हे विशेष.
अमरावती - येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा.राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंटला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आणि स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, हे विशेष.
दिल्ली येथील विज्ञान भवनातील प्लेनरी हॉलमध्ये २ आॅक्टोबर रोजी राज्यातून एकमात्र मेघे अभियांत्रिकीला संस्था गटातून राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार बहाल करण्यात आला. केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री अहलुवालिया आणि नगरविकास विभागाचे सचिव मिश्रा यांच्या हस्ते दिनेश हरकुट व सारंग धावडे यांनी महाविद्यालयाच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सारंग धावडे, रामेश्वर इंगळकर, आशिष सायवान, अतुल डहाणे, रश्मी सोनार आदींनी रासेयो विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुरस्कार मिळाल्याने स्वच्छतेबाबतची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली.
हा पुरस्कार मेघे अभियांत्रिकीला मिळाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मिशन स्वच्छ भारत' या हाकेला साद देत मेघे अभियांत्रिकीने २ आॅक्टोबर २०१४ पासून या अभियानात सहभाग घेतला. स्वच्छ भारत अभियान ही चळवळ राबविताना मेघे अभियांत्रिकीचे रासेयो पथक, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाºयांनी स्वत:ला झोकून देत अमरावती व बडनेरा शहरात निरंतर स्वच्छता अभियान राबविले. तसेच विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने स्वच्छ भारत अभियानास अपेक्षित असा संस्थेचा विकास केला. अभियांत्रिकीचा स्वच्छ परिसर, देखण्या इमारती, दर्जेदार शिक्षण आदी बाबी स्वच्छ भारत पुरस्कारासाठी पूरक ठरल्याचे संस्थेचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत सांगितले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने संस्थेला विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय स्वच्छ भारत मिशन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर सन २०१४ पासून प्राचार्य एम.एस.अली, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी सारंग धावडे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचाºयांनी स्वच्छतेसंदर्भात हिरीरीने सहभाग घेतला. महाविद्यालयाचा परिसर सतत स्वच्छ ठेवण्यात चमू यशस्वी ठरली. पत्रपरिषदेला विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष विनय गोहाड, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराज चौधरी, तर सदस्य हेमंत देशमुख, नितीन हिवसे, उदय देशमुख, गजानन काळे, रागिणी देशमुख, प्राचार्य एम.एस. अली, प्रभारी प्राचार्य एन.व्ही. ठाकूर आदी उपस्थित होते.