जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन अमरावतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:53 PM2019-08-07T16:53:04+5:302019-08-07T16:54:04+5:30
जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रचे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ आॅगस्ट दरम्यान येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे.
अमरावती - जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रचे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ आॅगस्ट दरम्यान येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. रविवारी ११ आॅगस्ट रोजी शिवमती निलिमा इंगोले यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षास्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रेखा पाटील चव्हाण, तर स्वातगाध्यक्ष म्हणून पीआर पोटे एज्युकेशन ट्रस्टच्या संचालक अनुराधा पोटे असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा शीला पाटील यांनी बुधवारी पत्रपषिदेत दिली.
शनिवार, १० आॅगस्ट रोजी पहिल्या सत्रात सायंकाळी ४ वाजता जिजाऊ पालखी सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ११ आॅगस्ट रोजी दुसºया सत्रात ‘विद्रोही संत तुकाराम’ निवडक अभंगाचे साभीनय सादरीकरण सकाळी ९ ते १० यावेळी करण्यात येणार आहे. दुसºया सत्रात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना करण्यात येईल. या सत्राच्या अध्यक्ष म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ सोनाली देशमुख राहतील. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, माजी आमदार रेखा खेडेकर आदी उपस्थिती राहणार आहेत. अधिवेशनादरम्यान विविध सत्रांत विविध विषयांवर तज्ज्ञ आपले विचार व्यक्त करतील, असे शीला पाटील यांनी सांगीतले. पत्रपरिषदेला मयुरा देशमुख, केंद्रीय उपाध्यक्ष कीर्तीमाला चौधरी, विभागीय अध्यक्ष सीमा बोके, जिल्हाध्यक्ष शीला पाटील, महानगर अध्यक्ष मनाली तायडे, उपाध्यक्ष मंजू ठाकरे उपस्थित होत्या.