राष्ट्रीय अन्न सुरक्षेत ९९ लाख शिधापत्रिकांचा समावेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:00 PM2018-05-25T23:00:56+5:302018-05-25T23:01:13+5:30
राज्यात आधार सीडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ९९ लाख शिधापत्रिकांचा समावेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात आधार सीडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ९९ लाख शिधापत्रिकांचा समावेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
मंत्रालयस्तर सुनावनीसाठी असलेली अपिलाची प्रकरणे आता विभागीय स्तरावरच निकाली काढण्यात येणार आहे. अमरावती विभागातील १८ प्रकरणे गुरूवारी निकाली काढण्यात आली. नव्या प्रक्रियेमुळे मुंबईला येण्याचा त्रास वाचत असल्याचे ना. बापट म्हणाले. ४४ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ५६.६३ लाख आणि ५९ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ३६.७३ लाख व अन्य असे एकूण ९९ लाख ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल मर्यादा वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार ३० एप्रिलपर्यंत आधार सिडींग होऊन पात्र सर्व लाभार्थींचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश होईल, असे ना. बापट यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विभागीय पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर उपस्थित होते.
बडनेऱ्यातील ‘त्या’ तथाकथित धाडीची चौकशी
सात कोटी एवढ्या इष्टाकांच्या मर्यादेत लाभार्थी सामावून घेताना अंत्योदय व बीपीएलचे सर्व लाभार्थी सामावून घेतले जाणार आहे. परंतु केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्याकरिता एक लाख एवढ्या वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा असल्याने शहर व ग्रामीण भागात विहीत उत्पन्नाच्या मर्यादेत लाभार्र्थींचा समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बडनेरा येथील एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक रेशन दुकान दिले गेले. त्या व्यक्तीला देण्यात आलेल्या रेशन दुकानासह पुरवठा विभागाच्या तथाकथित धाडीविषयीच्या चौकशीचे आदेश ना. बापट यांनी दिले.