चांदूर बाजारातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला ठिकठिकाणी तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:00 AM2021-10-25T05:00:00+5:302021-10-25T05:01:00+5:30
व्यावसायिकदृष्ट्या दळणवळणाची साधने सुविधायुक्त व्हावी, याकरिता संपूर्ण देशात रस्त्याचे जाळे विणण्याचे संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. या दृष्टिकोनातून देशभरातील संपूर्ण मुख्य रस्ते हे उच्च दर्जाचे तयार करण्यात येत आहेत. यामुळे हे रस्ते अधिक काळ टिकावे, याकरिता काँक्रीटीकरण करून तयार करण्यात येत आहे. हे रस्ते जवळपास २५ ते ३० वर्षे दर्जेदार राहणार असल्याचे सांगण्यात येते.
सुमीत हरकूट
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातून जाणारा ३५३ जे या राष्ट्रीय महामार्गचे काम गेल्या एका वर्षापासून सुरू आहे. मात्र, या रस्त्यावर अनेक जागी मोठे तडे गेले आहेत. हा राष्ट्रीय मार्ग एका वर्षातच खोदून पुन्हा तयार करण्याची वेळ कंत्राटदारावर आली आहे.
व्यावसायिकदृष्ट्या दळणवळणाची साधने सुविधायुक्त व्हावी, याकरिता संपूर्ण देशात रस्त्याचे जाळे विणण्याचे संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. या दृष्टिकोनातून देशभरातील संपूर्ण मुख्य रस्ते हे उच्च दर्जाचे तयार करण्यात येत आहेत. यामुळे हे रस्ते अधिक काळ टिकावे, याकरिता काँक्रीटीकरण करून तयार करण्यात येत आहे. हे रस्ते जवळपास २५ ते ३० वर्षे दर्जेदार राहणार असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार चांदूर बाजार तालुक्यात सुरू असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला दीड ते दोन वर्षांचा कालावधी झाला. या कालावधीत मोर्शी ते परतवाडा या महामार्गाचे काम सुरू आहे. अद्यापही हा रस्ता पूर्ण झाला नसला तरी एका वर्षातच या रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठ्या तडे गेले आहेत. तालुक्यातील मासोद येथे हा रस्ता एक ते दीड किलोमीटर खोदून पुन्हा तयार करण्याची वेळ आली आहे. रस्त्याचे कंत्राट एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीने घेतला आहे. २५ वर्षांच्या हमीकाळात त्यांना आणखी किती कामे करावी लागणार, असा प्रश्न करीत नागरिकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.