इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय विरोध प्रदर्शन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:28+5:302021-06-18T04:10:28+5:30

सर्व डॉक्टर व वैद्यकीय व्यवसायिक, आपला रुग्ण वाचला पाहिजे यासाठी, त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न करीत असतात. मात्र गेल्या काही ...

National Protest Day by Indian Medical Association | इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय विरोध प्रदर्शन दिन

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय विरोध प्रदर्शन दिन

Next

सर्व डॉक्टर व वैद्यकीय व्यवसायिक, आपला रुग्ण वाचला पाहिजे यासाठी, त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न करीत असतात. मात्र गेल्या काही महिन्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षात महाराष्ट्र राज्यात डॉक्टरांवर तसेच रुग्णालयांवर हल्ला करण्याच्या 57 तसेच देशभरात 272 दुर्दैवी घटना घडल्या. तसेच अगदी स्पष्ट पुरावे असताना सुद्धा गुन्हेगारांना शासन होण्यामध्ये विलंब होत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांना निर्भयपणे रुग्णांचा उपचार करणे आणखीनच कठीण होऊन बसते. नुकत्याच एका सर्वेक्षणात असे आढळून आले, की अशा भयप्रद वातावरणात काम करताना, रुग्ण वाचण्याची शक्यता कमी असल्यास, अशा रुग्णांना हायर सेंटरला रेफर करण्याचे प्रमाणही वाढीस लागते. या सर्व परिस्थितीमध्ये गंभीर रुग्णाचे, तसेच समाजाचे, मोठे नुकसान होते.

म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांना भयमुक्त वातावरणात काम करण्याच्या परिस्थिती शासनाने व समाजाने उपलब्ध करून देणे समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

सदर विरोध प्रदर्शन आंदोलनाच्या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे शासनापुढे खालील मागण्या करण्यात येत आहेत.

1. रुग्णालय व आरोग्य आस्थापनांच्या संरक्षणासाठी सक्षम केंद्रीय कायदा इंडियन पिनल कोड अंतर्गत तसेच क्रिमिनल प्रोसीजर कोडला संलग्नित करून त्वरित करण्यात यावा.

2. प्रत्येक रुग्णालयात सक्षम सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी

3. रुग्णालयांना संरक्षित क्षेत्र घोषित करावे.

4. रुग्णालय, वैद्यकीय आस्थापना तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा लवकरात लवकर होईल याची व्यवस्था करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: National Protest Day by Indian Medical Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.