मेळघाटात राष्ट्रीय आदिवासी कोरकू सांस्कृतिक महासंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:04 PM2018-11-20T22:04:32+5:302018-11-20T22:04:49+5:30
राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी बांधवांचे कोरकू महासंमेलन पहिल्यांदा मेळघाटात पार पडले. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगड, झारखंड, आसाम गुजरात, राजस्थानातून आदिवासी बांधव आले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हे महासंमेलन घेण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
पंकज लायदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी बांधवांचे कोरकू महासंमेलन पहिल्यांदा मेळघाटात पार पडले. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगड, झारखंड, आसाम गुजरात, राजस्थानातून आदिवासी बांधव आले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हे महासंमेलन घेण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
भारतीय स्तरावर अनेक परिक्षेत्रात कोरकू समाजाची लोकसंख्या २० लाखांच्या वर असून मेळघाटात सर्वात जास्त आदिवासी कोरकू बांधव राहतात. आधुनिक युगात आदिवासी संस्कृती, भाषा नष्ट होत असल्याचे दिसून येत असल्याने ते टिकविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कोरकू बांधवांनी एकत्र येऊन राष्ट्रीय आदिवासी कोरकू महासंमेलन शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी मेलघाटातील धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल मैदानात आयोजन केले होते. त्या महासंमेलनाचे अध्यक्ष नंदकिशोर पालवे उद्योगपती (पुणे) हे होते. व्यासपीठावर कॉम्रेड वारू दादा सोनवणे (नंदूरबार), सांगल्याभाई वळवी (गुजरात), रामकिसनजी वळवी, माधुरी बहन (मध्यप्रदेश), काशीनाथ ब्रहाटे (परतवाडा) हे उपस्थित होते. यावेळी हजारो आदिवासी बांधवांना आदिवासी संस्कृती टिकविणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे मौलिक विचार नंदकिशोर पालवे यांनी मांडले. आपल्याकडून आजपर्यंत कळत न कळत झालेल्या चुका आपल्या येणाऱ्या पिढीकडून होऊ नये, त्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन आदिवासी संकृतीचे जतन करण्याच्या हे महासंमेलन आयोजित केले आहे. राज्यातील २२ आदिवासी संघटनांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी आ. प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार केवलराम काळे, राजकुमार पटेल, जीप सदस्य दयाराम काळ,े सभापती रोहित पटेल, उपायुक्त रमेश मावस्कर, हिरालाल मावस्कर रमेश तोटे आदी उपस्थित होते.