श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय वेविनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:06+5:302021-08-12T04:16:06+5:30
अमरावती : श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी डॉ. एस.आर. रंगनाथन जयंतीप्रीत्यर्थ दुसऱ्या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात ...
अमरावती : श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी डॉ. एस.आर. रंगनाथन जयंतीप्रीत्यर्थ दुसऱ्या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रिसर्च अँड करियर अंड कौन्सिलिंग सेलचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य वर्षा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य अंजली ठाकरे होत्या.
याप्रसंगी अंजली ठाकरे यांनी वर्षा देशमुख यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. बीपीएडची विद्यार्थिनी समीक्षा बर्वे हिला बेस्ट लायब्ररी व्हिजिटर अवाॅर्ड व डीवायएडचा विद्यार्थी सुमन कुमार याला बेस्ट लायब्ररी यूजर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक सहायक ग्रंथपाल स्वाती न्याहटकर यांनी केले. नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक शालिनी लिहीतकर व पुणे येथील मॉडर्न आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या मुख्य ग्रंथपाल शांताश्री सेनगुप्ता यांनी मार्गदर्शन केले. आयक्यूएसी समन्वयक पी.एस. सायर यांनी कार्यक्रमाचा आढावा विशद केला. संचालन मयूरा फरकाडे यांनी केले. आयोजनाकरिता यू.व्ही. देशमुख, पी.एम. देशमुख, चेतक शेंडे, सुशांत कुकडे आदी प्राध्यापकांसह नीलेश ठाकरे, विनोद मसराम, स्वाती देशमुख, अमृता गुल्हाने, प्रमोद इंगळे, धीरज देशमुख, प्रदीप झांबरे, ज्ञानेश्वर ठाकरे, अमृता गुल्हाने व सचिन निचले यांनी परिश्रम घेतले.