राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 10:57 PM2018-03-13T22:57:49+5:302018-03-13T22:57:49+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण व शहरच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी गर्ल्स हायस्कूल चौक येथून जिल्हाकचेरीवर विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण व शहरच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी गर्ल्स हायस्कूल चौक येथून जिल्हाकचेरीवर विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने रायुकाँचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जनआक्रोश मोर्चातील रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, समन्वयक संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, शहराध्यक्ष गुडू ढोरे, कार्याध्यक्ष नंदकिशोर रेखाते, जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, वसंत घुईखेडकर, निखिल ठाकरे, अनिल ठाकरे, विजय भैसे, वसुधा देशमुख, अरूण गावंडे, गणेश खारकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संगीता ठाकरे, भाष्कर ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र महल्ले व अन्य पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देत मागण्यांकडे लक्ष वेधले. प्रमुख मागण्यामध्ये मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी बेरोजगार युवकांना सरकारी नोकºया देण्याबाबत आश्वस्त केले, मात्र यात अद्यापही काहीच कार्यवाही झालेली नाही. तीन वर्षांपासून एससी, एसटी, ओबीसी, आर्थिक दुर्बल घटकांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवलेत, त्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, मेक इन महाराष्टÑ मॅग्नेटिक महाराष्टÑ या माध्यमातून किती गुंतवणूक व किती रोजगार उपलब्ध झाला, याचे उत्तर देण्यात यावे, एमपीएसीच्या जागा कमी केल्यात त्या वाढण्यिात याव्यात, राज्यात फसवी झालेली कर्जमाफी, अजूनही न थांबलेल्या शेतकरी बांधवांच्या सरकारच्या विरोधातल्या आत्महत्या, बंद पडलेल्या सिंचन योजना, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना अजूनही न मिळालेली नुकसानभरपाई, रिद्धपूरला मराठी विद्यापीठ झाले पाहिजे, शेतकºयांना न मिळालेला योग्य तो हमी भाव, जीएसटीमुळे त्रस्त असलेले व्यापारी वर्ग, गारपीटग्रस्त शेतकºयांना न मिळालेली मदत त्वरीत देण्यात यावी आदी मागण्या जिल्हाधिकाºयामार्फत शासनाकडे निवेदनाव्दारे केल्या आहेत. यावेळी मोर्चात गुडू धर्माळे, शुभम शेगोकार, समीर इंगोले, कोमल निघोंट, राम बुरघाटे, अथिजित धर्माळे, विवेक टेकाडे, विजय कान्हेरकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.