पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखुडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:27+5:302021-07-12T04:09:27+5:30

अमरावती : खरिपाला सुरुवात होऊन दीड महिना झाला असला तरी राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखुडता आहे. अमरावती विभागात ...

Nationalized banks are reluctant to disburse peak loans | पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखुडता

पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखुडता

Next

अमरावती : खरिपाला सुरुवात होऊन दीड महिना झाला असला तरी राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखुडता आहे. अमरावती विभागात सद्यस्थितीत ४,१६,५२३ शेतकरी खातेदारांना ३,६०९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५२.४९ टक्केवारी आहे. यात जिल्हा बँकेचा टक्का ८४.२९ असताना व्यापारी बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत ३४.४५ टक्केच वाटप केलेले आहे.

अमरावती विभागात अकोला जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यात खरिपाची ८० टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा स्थितीत बियाण्यांसह रासायनिक खतांसाठी पीककर्जाची निकड असताना राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना माघारी पाठवित आहे.

विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्हा बँकेने आतापर्यंत २,४७,६५४७ शेतकऱ्यांना ३,९८,७०० हेक्टरसाठी १,९०९.१६ कोटींचे वाटप केलेले आहे. ही सर्वाधिक ८४.२९ टक्केवारी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३६२.६३ कोटी म्हणजेच ८९.५४ टक्के, अकोला जिल्ह्यात ४५९.२२ कोटी (८३.२४ टक्के), वाशिम जिल्ह्यात ४४९.७७ कोटी (७४.३४ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ३९.६५ कोटी (६०.०८ टक्के) व यवतमाळ जिल्ह्यात उच्चांकी ५९७.८७ कोटी (९३.७१ टक्के) कर्जवाटप केले आहे.

बॉक्स

जिल्हानिहाय कर्जवाटपाची स्थिती

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ७१६.८७ कोटी (५९.७४ टक्के), अकोला जिल्ह्यात ६७८.१४ (५९.१४ टक्के), वाशिम जिल्ह्यात ६०२.१९ कोटी (५८.७५ टक्के), बुलडाणा जिल्ह्यात ४५६.४७ कोटी (३५.११ टक्के) व यवतमाळ जिल्ह्यात ११५५.३२ कोटी म्हणजेच ५२.४९ टक्के कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. खरीप कर्ज वाटपाचे १०० दिवस झाले असताना व्यापारी बँकांचा वेग अद्याप वाढलेला नसल्याचे दिसून येते.

Web Title: Nationalized banks are reluctant to disburse peak loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.