पोहरा, चिरोडी जंगलात निसर्ग सफारी आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:06 PM2017-11-12T23:06:23+5:302017-11-12T23:06:49+5:30

शहरानजीकच्या पोहरा- चिरोडी जंगलाचे वैभव, विविध पक्ष्यांसह वन्यप्राणी बघता यावे, यासाठी सोमवार १३ नोव्हेंबरपासून निसर्ग सफारीला प्रारंभ होत आहे.

Nature Safari from Pohra, Chirodi Forest | पोहरा, चिरोडी जंगलात निसर्ग सफारी आजपासून

पोहरा, चिरोडी जंगलात निसर्ग सफारी आजपासून

googlenewsNext
ठळक मुद्देजंगल समृद्धीकडे वाटचाल : लवकरच १२ किमी.चा दुसरा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरानजीकच्या पोहरा- चिरोडी जंगलाचे वैभव, विविध पक्ष्यांसह वन्यप्राणी बघता यावे, यासाठी सोमवार १३ नोव्हेंबरपासून निसर्ग सफारीला प्रारंभ होत आहे. वन विभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचा मानस वनविभागाने व्यक्त केला आहे.
पोहरा-चिरोडी जंगलात काही महिन्यांपासून नवाब या वाघाचे वास्तव्य असल्याने हे जंगल अधिक प्रमाणात चर्चेत आले आहे. बिबट, हरिण, नीलगाय, मोर, चितळ आदी वन्यप्राणी बहुसंख्येने असून पक्ष्यांच्या सुमारे ४० प्रजाती येथे असल्याची नोंद वनविभागात आहे. विविध फुलझाडे हे पोहरा-चिरोडी जंगलाचे वैशिष्ट्य असून अनेक प्रजातीच्या फुलपाखरांचा मुक्त विहार येथे आहे. रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी निसर्ग सफारीची संकल्पना पुढे आणली. वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात पोहºयाचे वनपाल विनोद कोहळे, चांदूर रेल्वेचे वनपाल आशिष गावंडे हे निसर्ग सफारीची धुरा सांभाळतील. पोहरा वनविभागाच्या विश्रामभवनातून निसर्ग सफारीला प्रारंभ होईल. पाच किमी.च्या प्रवासात पोहरा येथून चिरोडी, वरूडा टी-पॉर्इंट, वनकुटी ते चिरोडी पुन्हा पोहरा असा मार्गक्रमण राहील. सकाळी ५ ते ७ तर सायंकाळी ४ ते ६ असे निसर्ग सफारीचे वेळापत्रक ठरविले आहे. येत्या काही दिवसांत निसर्ग सफारीचा दुसरा टप्पा प्रारंभ होणार आहे. मालखेड, छत्री तलाव, बोडना कॅम्प पुढे तपोनेश्वर, असा १२ कि.मी.चा मार्गक्रमण राहणार आहे.

वाघ, बिबट बघण्याची संधी : वन विभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा उपक्रम
वºहाडी जेवणाचा घेता येईल आस्वाद
पोहरा जंगलात विस्तीर्ण तलाव आहे. या तलाव परिसरात पर्यटकांना वºहाडी जेवणाचा आस्वाद घेता यावा, यासाठी सुशिक्षित बेरोजगार संघटनेला वºहाडी जेवणाचे प्रायोगिक तत्त्वावर कंत्राट सोपविले जाणार आहे. तलाव परिसरात पर्यटकांना लवकरच वºहाडी जेवणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

खासगी वाहनाद्वारे निसर्ग सफारी
पोहरा - चिरोडी जंगलात निसर्ग सफारीसाठी वनविभागाने स्वतंत्र वाहन उपलब्ध केलेले नाही. परंतु निसर्ग सफारी पर्यटक, नागरिकांना त्यांच्या खासगी वाहनांनी सफारी करता येईल. त्याकरिता प्रतीवाहन १०० रुपये, तर निसर्ग सफारीसाठी प्रतीव्यक्ती २० रुपये आणि गाईडचे १०० रुपये शुल्क वनविभाग घेणार आहे.

पोहरा-चिरोडी जंगलात भरपूर वनसंपदा आहे. वन्यप्राण्यांचेही वास्तव्य ही जमेची बाजू आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी निसर्ग सफारी सुरु होत आहे. पर्यटकांकडून घेण्यात येणारे शुल्क संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केली जाईल.
- हेमंत मिणा,
उपवनसंरक्षक, अमरावती

Web Title: Nature Safari from Pohra, Chirodi Forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.