कोंडेश्वर परिसराला यात्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:22 PM2018-02-13T22:22:30+5:302018-02-13T22:23:07+5:30

श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच येथे रांगा लागल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

Nature of Yatra in Kondeshwar area | कोंडेश्वर परिसराला यात्रेचे स्वरूप

कोंडेश्वर परिसराला यात्रेचे स्वरूप

googlenewsNext
ठळक मुद्दे‘हर हर महादेव’चा घोष : ढगाळ वातावरणातही शिवभक्तांच्या गर्दीला उधाण

आॅनलाईन लोकमत
बडनेरा : श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच येथे रांगा लागल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
महाशिवरात्रीच्या पहाटे ५ वाजता श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थानमधील पिंडीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात. कोंडेश्वर हे अनेकांचे कुळदैवत आहे. भाविकांसाठी बडनेरापासून ठिकठिकाणी पाण्याचे, ज्यूस, फराळी पदार्थांचे मोफत स्टॉल्स लागले होते. एसटी महामंडळाच्या बसेस सुरू होत्या. यानिमित्त यात्रा भरली होती.
महाशिवरात्रीच्या दुसºया दिवशी भव्य महाप्रसाद होत असतो. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस निरीक्षक गोपाल भारती पोलीस बंदोबस्तासह हजर होते.

Web Title: Nature of Yatra in Kondeshwar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.