Navneet Rana: राणा दाम्पत्याच्या घरावर शिवसेनेचा मोर्चा, आक्रमक महिलांनी फेकल्या बांगड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 01:00 PM2022-04-17T13:00:05+5:302022-04-17T13:02:51+5:30

आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांनी निषेध आंदोलन सुरू केले आहे.  

Navneet Rana: Shiv Sena march on Rana couple's house, bangles thrown by women | Navneet Rana: राणा दाम्पत्याच्या घरावर शिवसेनेचा मोर्चा, आक्रमक महिलांनी फेकल्या बांगड्या

Navneet Rana: राणा दाम्पत्याच्या घरावर शिवसेनेचा मोर्चा, आक्रमक महिलांनी फेकल्या बांगड्या

googlenewsNext

अमरावती - अमरावतीत हनुमान चालिसावरून जोरदार राजकीय वातावरण तापलं आहे. युवा सेनेने राणा दाम्पत्याच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले होते. त्यानंतर, शिवसेना मुख्यालय असलेल्या मुंबईतील 'मातोश्री' बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर, आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांनी निषेध आंदोलन सुरू केले आहे.  

देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर, जरूर माझ्या नावाने मुर्दाबादचे नारे लावावेत, अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना खडे बोल सुनावले होते. हनुमान जयंतीनिमित्त राणा दाम्पत्याने हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी, संकटमोचक हनुमान आपल्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, त्यादिवशी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करेन, अशा शब्दात नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना आव्हान दिलं. त्यानंतर, आज पुन्हा शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अमरावतील येथील राणा कुटुंबीयांच्या घराकडे शिवसैनिकांनी मोर्चा वळवला होता. मात्र, पोलिसांनी वाटेतच त्यांना अडकवले. त्यामुळे, शिवसैनिकांनी रस्त्यातच राणा दाम्पत्यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली आहे. तर, महिलांनी बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला. यावेळी, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेच्या आंदोलनात महिला आक्रमक दिसून आल्या. तर, भगवे झेंडे आणि हनुमानच्या वेशभूषेतील व्यक्तीही आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शिवसैनिकांना रोखण्यासाठी राणा समर्थकही त्यांच्या घराबाहेर उभे होते. यावेळी, राणा समर्थकांनी त्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण केले. तसेच, जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या. 

हनुमान चालिसा वाचू, यावरुन गोंधळ सुरू 

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू, असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याच्या अमरावतीतील घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. तसेच लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा वाचून आंदोलन केले. ३० मिनिटे युवासेनेने राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले. तर मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली होती.
 

Web Title: Navneet Rana: Shiv Sena march on Rana couple's house, bangles thrown by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.