Lok Sabha Election 2019; नवनीत यांचे चिन्ह गोठवले ऐनवेळी अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:08 PM2019-03-29T23:08:38+5:302019-03-29T23:09:40+5:30

नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Navneet's sign was frozen | Lok Sabha Election 2019; नवनीत यांचे चिन्ह गोठवले ऐनवेळी अडचणीत वाढ

Lok Sabha Election 2019; नवनीत यांचे चिन्ह गोठवले ऐनवेळी अडचणीत वाढ

Next
ठळक मुद्देआयोगाचा निर्णय : बसणार फटका, प्रतिस्पर्ध्याला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार आहेत. निवडणूक चिन्हांचे वाटप होण्यापूर्वीच त्यांनी अनेक ठिकाणी जाहीरपणे या चिन्हाचा वापर केला, अशी तक्रारदेखील या अनुषंगाने निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. मावळते खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्वत: जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन चिन्हाच्या या मुद्याबाबत तक्रार नोंदविली होती.
नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान हा पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे. परंतु,तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेला नाही. निवडणूक ही लोकसभेची असल्यामुळे टीव्ही हे चिन्ह गोठविण्याचादेखील मुद्दा समोर आला.
ऐनवेळीची अडचण, वेळही अपुरा
नवनीत राणा यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंदराव अडसूळ हे ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. आनंदराव आणि ‘धनुष्यबाण’ हे समीकरण जिल्हाभरात परिचित आहे.
नवनीत राणा यांच्याबाबत मात्र चित्र विपरीत आहे. त्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांचे बोधचिन्ह अपरिचित आहे. हा मुद्दा राणा यांनी फार पूर्वी हेरला होता. त्याचमुळे त्यांनी टीव्ही या चिन्हाचा वापर करणे सुरू केले होते. चिन्ह जिल्हाभरात पोहोचावे, हा त्यामागचा हेतू होता. त्यात बहुअंशी त्या यशस्वी झालेही; परंतु आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर टीव्ही चिन्ह गोठल्यामुळे सर्वत्र, गाव-खेड्यांत आणि मेळघाटसारख्या दुर्गम भागात त्यांना आयोगाने दिलेले नवेकोरे बोधचिन्ह पोहचविणे हे पृथ्वीला गवसणी घालण्यासम आहे.
मतदारंघातील काही भागांत नवनीत राणा यांना बोधचिन्हाच्या तांत्रिक कारणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. पूर्वी टीव्ही या चिन्हाचा प्रसार झाल्यामुळे आताचे नवे चिन्ह पोहोचलेही तरी संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते.

Web Title: Navneet's sign was frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.