‘ग्लासात ग्लास ३६ ग्लास…’, सदानंद सुळेंसाठी सुप्रिया सुळेंचा 'फर्स्ट क्लास' उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:41 PM2022-06-14T16:41:06+5:302022-06-14T16:41:48+5:30

सर्वत्र आज वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला.

ncp mp supriya sule vatapaurnima pujan amtavati sadanand sule navneet rana ravi rana puja | ‘ग्लासात ग्लास ३६ ग्लास…’, सदानंद सुळेंसाठी सुप्रिया सुळेंचा 'फर्स्ट क्लास' उखाणा

‘ग्लासात ग्लास ३६ ग्लास…’, सदानंद सुळेंसाठी सुप्रिया सुळेंचा 'फर्स्ट क्लास' उखाणा

Next

सर्वत्र आज वटपौर्णिमेचा सण (Vat Purnima) साजरा करण्यात आला. याच सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीत पती निधनानंतर वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमेची पूजा केली. दरम्यान, यावेळी त्यांनी घेतलेल्या एका विशेष उखाण्यानं सर्वांचच लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी ज्या महिलांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांसोबत ही वटपौर्णिमा साजरी केली. त्यांनी अमरावतीत विधवा महिलांसह वटपौर्णिमेचं पूजन केलं. अनेक स्तरातून त्यांच्या या कृतीचं कौतुकही केलं जात आहे. यादरम्यान, त्यांनी घेतलेला उखाणा हा सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा ठरला. महिलांच्या आग्रहास्तवर सुप्रिया सुळे यांनी उखाणा घेतला. “ग्लासात ग्लास ३६ ग्लास, सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास,” असा उखाणा त्यांनी घेतला. यानंतर उपस्थित महिलांनीही त्यांचं कौतुक केलं.

नवनीत राणांनीही केलं पूजन
वटसावित्री पूजन दिनानिमित्त नवनीत राणा यांनी अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील कळमगव्हाण येथे महिलांसमवेत वटसावित्रीचे पूजन केलं. राजकीय कामकाजाल निघण्यापूर्वी त्यांनी वटसावित्रीचे पूजन करुन आपली संस्कृती जोपासली आहे. यावेळी कळमगाव येथील खासदार निधीमधून दहा लाख रुपयाच्या रोडचे भूमिपूजन देखील त्यांच्याहस्ते करण्यात आले. नवनीत राणा यांनी ही पूजा करत परंपरा जपल्याचं म्हटलं आहे. 

Web Title: ncp mp supriya sule vatapaurnima pujan amtavati sadanand sule navneet rana ravi rana puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.