इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची पेट्रोल पंपावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:44+5:302021-07-04T04:09:44+5:30

पंचवटी चौकात आंदोलन ; मोदी सरकार विरोधात रोष अमरावती ; गत काही महिन्यांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या ...

NCP strikes petrol pump against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची पेट्रोल पंपावर धडक

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची पेट्रोल पंपावर धडक

Next

पंचवटी चौकात आंदोलन ; मोदी सरकार विरोधात रोष

अमरावती ; गत काही महिन्यांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या दराने तर शंभरी पार केली आहे. डिझेलचा शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील पंचवटी चौकात मोदी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करत पेट्रोल पंपावर धडक दिली. यावेळी काही वेळ पेट्रोल व डिझेलची विक्री बंद पाळून आपला संताप व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणांमुळे मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर चांगलेच वाढले आहेत. वाढती महागाई ही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात रोष वाढत आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, कार्याध्यक्ष भास्कर ठाकरे, अनिल ठाकरे, जिल्हा महिला अध्यक्षा संगीता ठाकरे, संतोष महात्मे, अजित पटेल, सुचिता वनवे, निखिल ठाकरे, प्रदीप येवले, प्रशांत ठाकरे, सुशील गावंडे, प्रथमेश ठाकरे, गणेश खारकर, आकाश ढोले, सरला इंगळे, अस्मिता भडके, संगीता देशमुख, ममता हुतके, छाया कडू, मीना कोल्हे, सुषमा थोरात, नितीन ढोके, प्रफुल्ल सानप, मोहन चव्हाण, गणेश राय, अजय लेंडे, धीरज निंभोरकर, सूरज खान, सुनील कीर्तिकर, नसीम खान पठाण, गजानन खोंडोकार व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: NCP strikes petrol pump against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.