राष्ट्रवादीचे मोर्शीतही आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:09+5:302021-05-20T04:14:09+5:30

मोर्शी : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किमती अस्मानाला भिडल्यानंतर आता खतांचीही सरासरी ६०० ते ७०० रुपये दरवाढ ...

NCP's agitation in Morshi too | राष्ट्रवादीचे मोर्शीतही आंदोलन

राष्ट्रवादीचे मोर्शीतही आंदोलन

Next

मोर्शी : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किमती अस्मानाला भिडल्यानंतर आता खतांचीही सरासरी ६०० ते ७०० रुपये दरवाढ करण्यात आली. या किमती कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवाव्या, अशी मागणी मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करीत नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांना निवेदन दिले.

शेतकऱ्यांची विपरीत परिस्थिती लक्षात घेऊन गतवर्षीच्या किमतीमध्येच राज्याच्या मागणीनुसार खताचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, खते व रसायन मंत्री सदानंद गौडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकरिता देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे, माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश घारड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हितेश, साबळे, महेश नागले, प्रफुल खडसे, गजानन हूड, विनोद मोंढे, पंकज शेळके, आकाश साबळे उपस्थित होते.

Web Title: NCP's agitation in Morshi too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.