राष्ट्रवादी काँग्रेसचे गांधी जयंतीला मौनव्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:51 PM2018-10-02T21:51:00+5:302018-10-02T21:51:20+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून, कायदा आणि सुव्यस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ंत्यामुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे र्औचित्य साधून २ आॅक्टोबर रोजी येथील जयस्तंभ चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर धरणे व मौनव्रत आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून, कायदा आणि सुव्यस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ंत्यामुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे र्औचित्य साधून २ आॅक्टोबर रोजी येथील जयस्तंभ चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर धरणे व मौनव्रत आंदोलन केले.
वाढत्या महागाईने जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅससिलेडरचे दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. शेतमाला मिळत नसलेला हमीभाव,दूष्काळी परिस्थिती अशा विविध मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे व मौनव्रत आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.
दरम्यान आंदोलनाच्या प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मौनव्रत व धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजीमंत्री वसुधा देशमुख, माजी महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे, सुरेश कडू, अरूण गावंडे, जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगिता ठाकरे,शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, शहराध्यक्ष सतीश ढोरे,अनिल ठाकरे, अविनाश मार्डीकर,किशोर शळके, गुडू धर्माळे, नाना बोंडे, सुचिता वनवे, शरद देवरणकर, संतोष महात्मे, प्रदीप राऊत, मनोज गावंडे, शुभम शेगोकार,विश्र्वास मोरे, सुभाष तंवर,संतोष वासनकर, सुनील किर्तीकार, अभिजित धर्माळे, कल्पना वानखडे, सरला इंगळे, संगिता देशमुख, ममता हूचके, रवींद्र इंगोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.