संत्र्यावरील निर्यात करात सूट हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:30 AM2017-12-13T00:30:28+5:302017-12-13T00:30:47+5:30
संत्र्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या बांग्लादेशात भारतातील संत्रा निर्यातीवर ३० हजार रूपये प्रतिटन कर लावला जातो.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : संत्र्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या बांग्लादेशात भारतातील संत्रा निर्यातीवर ३० हजार रूपये प्रतिटन कर लावला जातो. हा कर कमी केल्यास संत्रा ५० हजार रूपये प्रती टनापर्यंत विकला जाऊन उत्पादकांना अधिक लाभ होईल, यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी ऊर्जा, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांना मंगळवारी सादर निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारतातून आयात होणाºया संत्र्यावर कर लावला जात असताना भूतान येथून विक्रीस येणाºया संत्र्यावर मात्र आयात कर नाही, हा दुजाभाव असल्याने मुख्यमंत्र्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन कर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. उत्पादकता वाढीसाठी तंत्रज्ञानात वृद्धी व नव्या जातीचे रोप तयार करण्यात यावीत. नागपुरी संत्रा बांग्लादेशात सर्वाधिक आयात केली जात असल्यामुळे पणन महामंडळाचे कार्यालय या ठिकाणी सुरू करावे आदी मागण्यांवर चर्चा केली. यावेळी राजेश्वर ठाकरे, रमेश जिचकार मनोहर सुने, रवीकिरण पाटील आदी उपस्थित होते.